- सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune News: पुणे शहरात गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शहरातील गजबजलेल्या लोहियानगर भागात गुंडांच्या एका टोळक्याने हातात तलवारी नाचवत धुमाकूळ घातला. केवळ हत्यारे दाखवून दहशत निर्माण केली नाही, तर या गुंडांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तसंच "पुण्यात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?" असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, लोहियानगर (Pune Lohiyanagar News) परिसरात रात्रीच्या सुमारास एका टोळी हातात तलवारी घेऊन आली. या टोळक्याने रस्त्यावर आरडाओरडा करत दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. शिवाय दगडफेकही केली. हा वाद नेमका कोणत्या कारणातून झालाय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्य किंवा वर्चस्व वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
(नक्की वाचा : Pune News: पुणे हादरले! 24 वर्षांचा तरुण आणि अल्पवयीन मुलगी; त्या प्रेमप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा खुलासा)
कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर
पुणे (Pune News) हे विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते, पण गेल्या काही महिन्यांपासून शहरात 'कोयता गँग' आणि स्थानिक गुंडांच्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे. लोहियानगरमधील या ताज्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंदवडे निघाले आहेत. भरवस्तीत गुंड उजळ माथ्याने हातात हत्यारे घेऊन फिरून धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
(नक्की वाचा: Crime News: मुंबई हादरली! भरदिवसा 19 वर्षांच्या तरुणीची गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून बसेल धक्का)
Pune CCTV Video पाहा व्हिडीओ
PuneCrime LohiaNagar SwordsTerror | पुण्याच्या लोहियानगरमध्ये आज कायद्याची चिपाडे उडवण्यात आली! हातात तलवारी आणि दगड घेऊन काही गुंडांनी धुमाकूळ घातला. सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडायचे कसे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. पोलिसांचा धाक संपल्याचे हे प्रतीक आहे का? हा व्हिडिओ… pic.twitter.com/hlEXouJ2Bz
— NDTV Marathi (@NDTVMarathi) February 11, 2026
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल,असे आश्वासन पुणे पोलिसांनी दिले आहे. या घटनेनंतर लोहियानगरमधील स्थानिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी आणि अशा घटनांवर आळा घालावा, अशी मागणी केली जातेय. त्यामुळे आता पुणे (Pune Crime Alert) पोलीस या गुंडांच्या मुसक्या आवळणार की ही गुंडगिरी अशीच सुरू राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world