एका महिलेला कपडे बदलताना पाहिलं, दुसरीने टेलरला भररस्त्यात धू धू धुतला; Video Viral 

पोलीस आले तरीही महिला टेलरला सोडत नव्हती, त्यांच्यासमोर त्याला मारहाण सुरू होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
उल्हासनगर:

उल्हासनगरात एका महिलेने टेलरला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या टेलरने अन्य एका महिलेला कपडे बदलताना पाहिल्याचा आरोप करीत महिलेने भररस्त्यात त्याला धू धू धुतला. या मारहाणीचा व्हिडिओ  व्हायरल झाला आहे. उल्हासनगरच्या स्टेशन रोड परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

नक्की वाचा - एक्स-बॉयफ्रेंडला नव्या मैत्रिणीसह जाळून मारले, अभिनेत्री नर्गिस फाकरीच्या बहिणीला अटक

या परिसरात एक महिला कपडे खरेदी करण्यासाठी आलेली असताना तिथल्याच एका टेलरने तिला कपडे बदलताना पाहिल्याचा आरोप त्या महिलेने केला. मात्र यावरून पीडित महिले ऐवजी दुसऱ्याच एका महिलेने टेलरला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलीस तिथे दाखल झाले, मात्र त्यांच्या समोरही या महिलेने टेलरला सुटका होऊ दिली नाही तर त्यांच्यासमोर त्याला मारहाण केली. 

नक्की वाचा - ​​​​​​​Shobhita Shivanna : दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत

याबाबत मूळ पीडित महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार केलेली नसून टेलर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मूळ पीडित महिलेला तक्रार देण्यासाठी बोलावण्यात आलं असून तिच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Topics mentioned in this article