
'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलिया हिला अटक करण्यात आली आहे. पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याची नवी मैत्रीण या दोघांना जाळून ठार मारल्याचा आलियावर आरोप आहे. एडवर्ड जेकब्स आणि अनास्तासिया अशी मृतांची नावे आहेत. एडवर्डच्या नव्या मैत्रिणीमुळे आलियाचा जळफळाट झाला होता. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून आलियाने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.
नक्की वाचा :नागा चैतन्य आणि शोभिताच्या प्री-वेडिंग सोहळ्यात समांताची एण्ट्री, PHOTOS सोशल मीडियावर व्हायरल
'डेली न्यूज' ने दिलेल्या बातमीत म्हटलंय की, न्यूयॉर्कमधील क्वीन्स भागातल्या एका दुमजली गॅरेजला आग लागली होती. यात एडवर्ड जेकब्स आणि अनास्तासियाचा मृत्यू झाला आहे. ही आग लावल्याचा आलियावर आरोप असून तिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, मात्र तिला जामीनही नाकारण्यात आला आहे. सरकारी वकील मेलिंडा काट्ज यांनी सदर खटल्याबाबत बोलताना सांगितले की, आरोपीने पद्धतशीरपणे दोघांना ठार मारले. तिने लावलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. दुर्दैवी एडवर्ड आणि अनास्तासिया यांचा नाकातोंडात धूर जाऊन गुदमरल्याने आणि भाजल्याने मृत्यू झाला.
नक्की वाचा :आई पंजाबी, भाऊ मुसलमान,वडील ख्रिश्चन आणि बायको हिंदू! कोण आहे स्वतःला सेक्युलर म्हणणारा हा अभिनेता
नर्गिस आणि आलियाच्या आईने मात्र आलियावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आपली मुलगी असं काहीही करू शकत नाही असं तिचं म्हणणं आहे. माझी मुलगी कोणालाही ठार मारू शकत नाही असं आलियाच्या आईने म्हटले आहे. आपली मुलगी ही प्रेमळ आणि इतरांची काळजी घेणारी होती. तिने आजवर सगळ्यांची मदत केली आहे असंही तिचं म्हणणं आहे.
नक्की वाचा : दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत
सदर दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीने सांगितले की आम्हाला काहीतरी जळत असल्याचा वास आला. तो इंधनामुळे लागलेल्या आगीचा होता का कसला होता हे माहिती नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. आम्ही जेव्हा धाव घेतली तेव्हा गॅरेजमधील कोच आणि पायऱ्यांना आग लागली होती. आम्ही उड्या मारून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अनास्तासिया बाहेर आली होती मात्र एडवर्डला वाचवण्यासाठी ती पुन्हा आत गेली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world