जाहिरात

Agra News: 'माझे अनेक बॉयफ्रेंड, त्यांच्यासोबत मी...' पत्नीकडून छळ; TCS च्या मॅनेजरने आयुष्य संपवलं

Agra Manav Sharma Ended Life: पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली अन् आयुष्य संपवले. मानव शर्मा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Agra News: 'माझे अनेक बॉयफ्रेंड, त्यांच्यासोबत मी...' पत्नीकडून छळ; TCS च्या मॅनेजरने आयुष्य संपवलं

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका आयटी कंपनी कर्मचाऱ्याने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूच्या आधी त्याने गळ्यात दोरीचा फास अडकवत लाईव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली अन् आयुष्य संपवले. मानव शर्मा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 हे संपूर्ण प्रकरण आग्रा जिल्ह्यातील डिफेन्स कॉलनीचे आहे, जिथे तिथे राहणारा मानव शर्मा एका मोठ्या आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. 24 फेब्रुवारी रोजी मानवने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी  मानवने एक वेदनादायक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीकडून कसा छळ होत होता, याबाबत खुलासा केला. 

व्हिडिओमध्ये मानव शर्मा म्हणतो की, मी माझ्या पत्नीला इतका कंटाळलो आहे की मृत्यूशिवाय पर्याय उरला नाही.पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदे केले पाहिजेत. यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 'बाबा मला माफ करा, मम्मी मला माफ करा, अक्कू मला माफ करा... आता मी रजा घेत आहे.' पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदे आवश्यक आहेत. कृपया कोणीतरी पुरूषांबद्दल बोला, ते खूप एकटे आहेत.

(नक्की वाचा- Swargate Case: ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)

मानव शर्माच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाचे लग्न गेल्या वर्षीच झाले. नोकरीमुळे तो त्याच्या सुनेला सोबत मुंबईला घेऊन गेला होता. पण सून त्याच्याशी रोज भांडायची. एवढेच नाही तर ती कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही देत ​​असे. सुनेचेही कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. 

फेब्रुवारीच्या अखेरीस मानव त्याच्या पत्नीसह मुंबईहून परतला. तो परत येताच ती तिच्या पालकांच्या घरी गेली. मानवला त्याच्या पत्नीच्या आई-वडिलांनी धमकावले होते.पत्नीही त्याचा त्याचा छळ करायची. या नैराश्यामुळे मानवने 24 फेब्रुवारी रोजी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवला आणि त्याचे दुःख व्यक्त केले.

निलम शिंदेंच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा, अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मंजूर

दरम्यान,  मानव शर्माचा 6.57 मिनिटांचा 'शेवटचा व्हिडिओ' हृदयद्रावक आहे गळ्यात फाशी घालून व्हिडिओ बनवताना, मानव भावनिक होतो  मी जाईन, पुरुषांबद्दल विचार करेन, कोणीतरी पुरुषांबद्दल बोलावे, बिचारे खूप एकटे असतात.. असं बोलून आयुष्य संपवतो. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.