11 वर्षाच्या मुलावर 9 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकरणाला 'अशी' फुटली वाचा

या घटनेत 11 वर्षीय मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. विशेष म्हणजे या घटनेत अत्याचार करणारे 9 जण ही अल्पवयीन आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
अहिल्यानगर:

लहान मुलं आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. अशीच एक हादरवून टाकणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेत  11 वर्षीय मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. विशेष म्हणजे या घटनेत अत्याचार करणारे 9 जण ही अल्पवयीन आहेत. हा घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपींची चौकशी केली जात आहे. मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात हा घृणास्पद प्रकार घडला आहे. इथे एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे.  अल्पवयीन मुलासोबत हे घृणास्पद कृत्य करणारे देखील अल्पवयीनच आहेत. या सर्वांनी मिळून त्या मुलावर सामुहीक अत्याचार केले आहेत. या आधी ते या 11 वर्षाच्या मुलाला सतत धमकावत होते. त्याला भिती दाखवून हे अत्याचार केले आहेत.  

ट्रेंडिंग बातमी -  मोबाइलवर मालिका पाहू नको, आईने लेकाला हटकले, लेकाने भयंकर कृत्य केले

अत्याचार झाल्यानंतर हा मुलगा सतत तणावाखाली राहात होता. शिवाय तो घाबरलेलाही दिसत होता. मुलाच्या वागण्यात झालेला बदल पालकांना दिसून आला. त्यांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. सुरूवातीला त्याने काही सांगितले नाही. त्याला तशी धमकी देण्यात आली होती. मात्र पालकांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने त्याच्या बरोबर झालेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. नौरात्रीत हा सर्व प्रकार घडल्याचे समोर येत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'भारत माता की जय घोषणेसह 21 वेळा तिरंग्याला सलाम ठोक', कोर्टाची 'त्या' तरुणाला अनोखी शिक्षा

ही गोष्ट पालकांना समजताच ते हादरून गेले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने आपल्या मुलाला घेवून श्रीरामपूरचे पोलिस स्टेशन गाठले. या अत्याचारप्रकरणी पीडित मुलाच्या आईने श्रीरामपुरात शहर पोलीसात फिर्यादी दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आरोपींची चौकशी सुरु असल्याचं पोलिस निरिक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले आहे. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.