अल्पवयीन मुलगा बराच वेळ मोबाईलवर मालिका पाहात बसला होता. त्यानंतर आईने त्याला हटकवे. हातातला मोबाईल काढून घेतला. याचा या मुलाला प्रचंड रागा आला. जसा आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे या भावनेने, त्याने मागचा पुढचा विचार न करता आईवरच हल्ला चढवला. हा हल्ला त्याने चक्क कात्रीने केला. शिवाय घरात तोडफोडही केली. हा प्रकार पाहून आई प्रचंड घाबरली. त्याच स्थितीत तिने पोलिस स्थानक गाठले. झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसंना दिली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी निरिक्षण गृहात करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा संपुर्ण प्रकार पुण्यातील धनकवडी इथे घडला. मुलगा आणि त्याची आई मोबाइलवर रात्री मालिका पाहात बसले होते. बऱ्याच वेळ मोबाइलवर मालिका पाहात असल्याने मोबाईल पाहाणे आता थांबव, असे मुलाला आईने सांगितले. पण मुलाने आईचे काही ऐकले नाही. त्यानंतर आईने त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. त्याचा प्रचंड राग मुलाला आहे. त्याचा संताप अगदी टोकाला गेला. त्याने हातात कात्री घेतली. त्याने त्याच्या आईवर जोरदार हल्ला चढवला. शिवाय घरातले कपाट, खिडक्यांच्या काचा याची तोडफोड केली.
हा मुलगा अल्पवयीन आहे. तो सातव्या वर्गात शिकत असून त्याचे वय 14 वर्षे आहे. झालेल्या प्रकाराने आई पुर्ण पणे हादरून गेली होती. तिने तातडीने पोलिस स्थानक गाठत याबाबत तक्रार दाखल केली आहे. आता या मुलाला निरिक्षण गृहात ठेवले जाणार आहे. अति मोबाइल वापराचा परिमाण या मुलावर झाला आहे. निरिक्षण गृहात त्याला बाबत सांगितले जाईल. शिवाय तो निरिक्षणाखालीही इथे राहाणार आहे. दरम्यान त्याने केलेल्या या हल्लात दुखापत झालेले नाही. मात्र आई पुर्ण पणे हादरून गेली आहे.
कोविड काळात घरातूनच शिक्षण सुरू होते. त्यावेळी हा मुलगा मोबाइलच्या प्रचंड आहारी गेला होता. तिच सवय त्याची पुढे कायम राहीली. त्यामुळे मोबाइल शिवाय त्याचे कोणतेही काम होत नव्हते. तो सतत मोबाइलवर असे. त्यामुळे जर कोणी मोबाइल हातातून काढून घेतला. त्याबाबत हटकले तर त्याला राग येत होता. तसाच काहीसा प्रकार त्याच्या आईबरोबर झाला. राग आल्याने चक्क त्याने कात्रीनेच सख्ख्या आईवर हल्ला चढवला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world