Ahilyanagar :पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचविण्याची तयारी, सापांच्या बहाण्याने गांजाची तस्करी, आकाश कसा अडकला?

हा पठ्ठ्या पोलिसांना चकवा देण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करीत होता.  जेणेकरून कोणत्याही चेकपोस्टवर संशय येणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ahilyanagar News : समाज माध्यमांवर सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगरच्या एका युट्यूबरचा खरा चेहरा आता समोर आला आहे. सर्पमित्र आकाश जाधव असं त्याचं नाव आहे. आकाश जाधव याचे युट्युबवर तब्बल ५६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. सापांना जीवनदान देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींच्या गांजाची तस्करी करणाऱ्या आकाश जाधव याला छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या अटकेने एकच खळबळ उडाली आहे. 

रुग्णवाहिकेतून तब्बल ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त

७ जानेवारीला महासमुंद पोलिसांनी संशयावरून एका रुग्णवाहिकेची झडती घेतली होती. रुग्णवाहिकेतून तब्बल ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. सुरुवातीला ३ तस्करांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड आकाश जाधव असल्याचे उघड झाले. आकाश जाधव सोशल मीडियावर स्वतःला पर्यावरण प्रेमी आणि स्नेक रेस्क्यूअर असल्याचे दाखवायचा. सापांचे रेस्क्यू करतानाचे त्याचे व्हिडिओ लाखो लोक पाहायचे. मात्र, याच लोकप्रियतेच्या आणि विश्वासाच्या आडोशाने तो ओडिशावरून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करत होता.

नक्की वाचा - Bhiwandi News : भटक्या कुत्र्याचा चावा, रेबिजचं इंजेक्शनही दिलं, पण 22 दिवसांनी मृत्यू; नेमकं काय चुकलं?

पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचवण्यापूर्वी...

पोलिसांना चकवा देण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात असे.  जेणेकरून कोणत्याही चेकपोस्टवर संशय येणार नाही. आकाश जाधवचे युट्युबच नाही तर इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याची ही क्लीन इमेज तस्करीच्या व्यवसायासाठी सुरक्षित कवच ठरत होती. तो पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचवणार होता, त्यापूर्वीच छत्तीसगड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईनंतर आता सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.