Ahmedabad Dosa Death Case Update: गुजरातच्या अहमदाबादमधील प्रजापती कुटुंबात दोन मुलींच्या संशयास्पद मृत्यूने देशभरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला बाजारातून आणलेल्या पिठापासून बनवलेले डोसे खाल्ल्याने विषबाधा झाली अन् यातच चिमुकलींचा मृत्यू झाला, आई वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असा संशय होता. मात्र आता या प्रकरणात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी डेअरीने विकलेल्या डोशाच्या पिठाच्या बॅचची तपासणी केली. त्यांनी पिठामध्ये कोणतीही भेसळ झाल्याचे कारण नाकारले आहे. इतर २०० लोकांनीही त्याच बॅचमधील पीठ विकत घेतले होते. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्यापैकी कोणीही आजारी पडले नाही. त्यामुळे कट रचून विषबाधा केल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
Mumbai News: पोलिसाचा प्रताप! आरोपीला न्यायालयाऐवजी थेट घरी नेले, पुढं जे घडलं... मुंबईत खळबळ
महत्त्वाचं म्हणजे तीन महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूमुळे तपास अधिकारी विशेषतः गोंधळले आहेत. मुलांना सहा महिने केवळ आईचे दूध पाजले जाते. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, तीन महिन्यांच्या मुलीला डोसा कोण खाऊ घालेल? पोलिसांनी सांगितले की ते व्हिसेरा आणि फॉरेन्सिक अहवालांची वाट पाहत आहेत, ज्यामुळे मृत्यूचे खरे कारण निश्चितपणे कळेल.
पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या आईवडिलांना मुलगा हवा होता म्हणून त्यांची हत्या झाली का, यावर आता तपास केंद्रित झाला आहे. मुलींच्या आईच्या माहेरच्या घरातून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. त्यात तिने लिहिले होते की, तिला मुलगा हवा आहे आणि तिची ही इच्छा पूर्ण झाल्यास ती मंदिरात जाऊन नवस पूर्ण करेल. मृत मुलींचे वडील विमल प्रजापती यांची चौकशी करण्यात आली. मुलींची आई, भावना, रुग्णालयात दाखल आहे. फोरेन्सिक चाचणीत आईवडिलांच्या रक्तात ॲल्युमिनियम फॉस्फाइड हे रसायन आढळले आहे, जे कीटकनाशके आणि उंदरांच्या विषात वापरले जाते.
Heatwave Warning: महाराष्ट्रावर मोठं संकट! पुढील 5 दिवस धोक्याचे; काम असेल तरच घराबाहेर पडा
मुलाच्या हव्यासाने घेतला जीव
मुलीच्या वडिलाने ॲल्युमिनियम फॉस्फाइड असलेले गहू टिकवण्या च्या औषधाचे १० पाकिटे खरेदी केल्याचे समजले. त्याने आठ पाकिटे वापरली होती, पण उरलेली दोन पाकिटे कुठे गेली हे तो सांगू शकला नाही." अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, विमलचे आई-वडील, गौरीशंकर आणि कुसुम प्रजापती यांचीही चौकशी करण्यात आली, कारण पोलिसांना समजले होते की त्या कुटुंबात अनेकदा आर्थिक वाद होत असत.
दरम्यान, असे मानले जाते की त्या जोडप्याला मुलगा हवा होता. एक मुलगी झाल्यानंतर, जेव्हा भावना दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तेव्हा तिने मंदिरात प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तिला मुलगा हवा होता, पण दुसऱ्यांदा तिला मुलगी झाली. यामुळे तिला खूप दुःख झाले. पोलिसांचा असा विश्वास आहे की, मुलीच्या इच्छेमुळेच भावनाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तथापि, या प्रकरणात विमलचा सहभाग होता की नाही, याचा तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world