जाहिरात

Mumbai News: पोलिसाचा प्रताप! आरोपीला न्यायालयाऐवजी थेट घरी नेले, पुढं जे घडलं... मुंबईत खळबळ

ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी आवेश तंजीम अहमद आणि पोलीस शिपाई गहिनीनाथ काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News: पोलिसाचा प्रताप! आरोपीला न्यायालयाऐवजी थेट घरी नेले,  पुढं जे घडलं... मुंबईत खळबळ
AI Image

ऋतिक गणकवार, मुंबई:

Mumbai Police News:  कैद्याला आर्थर रोड कारागृहातून सुनावणीसाठी न्यायालयाऐवजी थेट घरी घेऊन जाणे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. घरी गेल्यानंतर कैद्याने घरातून पोलिसाच्या हातावर तुरी देत पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपी आवेश तंजीम अहमद आणि पोलिस शिपाई गहिनीनाथ काळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

आरोपीला न्यायालयाऐवजी घरे नेले.. 

पोलीस प्रशासनातील बेजबाबदारपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका कैद्याला न्यायालयात हजर करण्याऐवजी त्याच्या घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस शिपायाला मोठा दणका बसला आहे. जोगेश्वरी येथील लोढा बेल एअर सोसायटीत कैद्याने पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी आवेश तंजीम अहमद आणि पोलीस शिपाई गहिनीनाथ काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pandharpur Acid Attack: पंढरपूर ॲसिड हल्ल्यात मोठा ट्वीस्ट! मुलीनेच रचला बनाव, पोलिसांकडे धक्कादायक कबुली

आवेश अहमद हा एका गंभीर गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. शुक्रवारी दिंडोशी सत्र न्यायालयात त्याच्या खटल्याची सुनावणी होती. त्याला कारागृहातून न्यायालयात नेण्याची जबाबदारी सशस्त्र विभागातील शिपाई गहिनीनाथ काळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. नियमानुसार आरोपीला पोलीस वाहनातून थेट न्यायालयात नेणे अपेक्षित होते.

पळ काढल्याने खळबळ! 

मात्र, अहमदने काळे यांना दहा हजार रुपयांचे प्रलोभन दाखवले आणि आपल्याला एकदा घरी जायचे असल्याची विनंती केली. ​पैशांच्या आमिषाला बळी पडून काळे यांनी आरोपीला दिंडोशी ऐवजी जोगेश्वरी येथील त्याच्या निवासस्थानी नेले. तेथे त्याचे कुटुंबीय आणि वकील उपस्थित होते. "आम्ही सुनावणीपूर्वी कोर्टात पोहोचू," असे आश्वासन अहमदने दिले होते. मात्र, वर्दीत असलेल्या काळे यांनी आरोपीवर विश्वास ठेवून त्याला घरात एकटे सोडले आणि हीच संधी साधून आरोपीने तिथून पळ काढला.

आरोपी गायब झाल्याचे लक्षात येताच काळे यांची पाचावर धारण बसली. अखेर वरिष्ठांना माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली. ओशिवरा पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ३५ (३) अन्वये काळे यांना नोटीस बजावली असून, पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Akola News: अकोल्यात 'या' ठिकाणी सुरु होता IPL चा सट्टा, 2 आरोपींनी पोलिसांना सांगितली आतली खबर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com