माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.. प्रेमविवाहाच्या नऊ महिन्यातच पतीने पळून जात दुसरं लग्न केलं. इतकच नाही तर त्याने पत्नीच्या मामे बहिणीला पळवलं आणि मंदिरात जाऊन तिच्याशी लग्नगाठ बांधली. या घटनेनंतर अकोल्यातील तरुणीच्या जीवनावर मोठा आघात झाला आहे. 9 महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील विझोरा गावातल्या सुरज तायडेसोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर बायको झालेल्या प्रेयसीला त्याने आयुष्यभर साथ देण्याचं वचनही दिलं होतं. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. त्यातच लग्नाच्या अवघ्या नऊ महिन्यानंतर पतीच्या कृत्यामुळे पीडितेच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे.
पीडित तरुणी बीएससी अॅग्रीकल्चरच्या शेवटच्या वर्षाला आहे. 11 जानेवारीला परीक्षा देण्यासाठी ती अमरावतीला आपल्या माहेरी आली होती. त्याचाच फायदा घेत पती सुरज तावडेने पत्नीला धोका दिला. धक्कादायक बाब म्हणते सूरजने पत्नीच्या मामे बहिणीसोबत लग्न केलं.
नक्की वाचा - Crime news: अल्पवयीन मुलीला पळवलं, राजस्थानमध्ये शरीरसंबध, पुढे पोलीस पोहोचले अन्...
मात्र, अमरावतीला परीक्षा देण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या माघारी त्यांनं दुसरं लग्न केलंय. पत्नीच्या मामे बहिणीसोबत त्याने लग्न केलंय.. दुसरं लग्न केल्यानंतर त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल करत आपण दुसरे लग्न केलं असून आता तू घरी येऊ नको असं म्हटलं. यानंतर त्याच्या पत्नीने थेट अकोला गाठलं. यानंतर ती सिव्हील लाईन पोलीस स्टेशनात पोहोचली. तेथे संतापलेल्या तरुणीने नव्या बायकोसह आलेल्या पतीची पोलीस स्टेशनच्या आवारातच चांगली धुलाई केली. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठी पळापळ झाली. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत पहिल्या पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस करीत आहे.
9 महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह...
9 मे 2024 रोजी सूरज तायडेने पीडितेसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला सूरजचे सर्व कुटुंबीय हजर होते. मात्र या लग्नाला पीडितेच्या कुटुंबाकडून कोणीच उपस्थित नव्हतं. दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचं पीडितेने सांगितलं. मात्र अचानक पतीने केलेल्या फसवणुकीमुळे पीडितेला जबर धक्का बसला आहे.