जाहिरात

Crime news: अल्पवयीन मुलीला पळवलं, राजस्थानमध्ये शरीरसंबध, पुढे पोलीस पोहोचले अन्...

पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द जऊळका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime news: अल्पवयीन मुलीला पळवलं, राजस्थानमध्ये शरीरसंबध, पुढे पोलीस पोहोचले अन्...
वाशिम:

स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना आणखी एक अत्याचाराचं प्रकरण समोर आले आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील जऊळका इथं घडली आहे. इथं एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत वारंवार अत्याचार केले. शिवाय तिला राहत्या घरातून पळवून ही नेले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीसात तक्रा दिली. ज्यावेळी पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले, त्यावेळी सत्या काय ते त्यांच्या समोर आले.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवण्यात आलं. त्यानंतर तिला पळवून नेत शारीरिक संबंध  ठेवले. राजस्थाच्या पाटण या ठिकाणी तो तरुणी त्या मुलीला घेवून गेला होता. तिथे ही त्याने त्या अल्पवयीन मुली बरोबर शरिर संबंध ठेवले. पण त्याच्या मागावर वाशिमचे पोलीस होते. त्याने मुलीला राजस्थान इथं पळवून नेलं आहे हे पोलीसांना समजले. त्यांनी तातडीने राजस्थानकडे कुच केली. 

(नक्की वाचा-  संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)

त्या ठिकाणी तरुण आणि मुलगी दोघे ही दिसून आले. या प्रकरणी आकाश करणे या तरुणाला जऊळका पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या तरुणाने या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. शिवाय लग्नाचे आमिष ही दाखवलं होतं. त्यातून तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. शेवटी त्याची मजल तिला पळवून नेण्यात गेली. 

(नक्की वाचा- विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब)

पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द जऊळका पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को, अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलीची आकाश करणे या तरुणासोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाचे व लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यातून तो वेळेवेळी तिच्या बरोबर संबध ठेवत होता हे ही आता उघड झालं आहे.