
योगेश शिरसाट
बँकेच्या एका उच्च अधिकार्याचा अश्लील व्हिडिओ काढून दोघांनी फसवणूक केल्याची घटना नुकती समोर आली आहे. अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एका बँकेच्या उच्च अधिकाऱ्याने एका "गे-डेटिंग" अॅपच्या माध्यमातून दोघां बरोबर ओळख निर्माण केली होती. हे दोघे ही अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत राहाणारे आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"गे-डेटिंग" अॅपच्या माध्यमातून तो बँक अधिकारी त्या दोन तरुणांच्या अधिक जवळ आला. शिवाय तो त्या दोघां बरोबर व्हाट्सअपच्या माध्यमातून चॅटिंग ही करू लागला. त्यातून या तिघांची ही एकमेकां बरोबर जवळीक वाढली. याच जवळीकीतून एक दिवशी या दोघांनीही खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणा रोडवरील मोरणा नदीच्या काठावर भेटण्याचा निर्णय घेतला. त्या बँकेच्या अधिकार्याला तिथं बोलावले गेले.
त्या ठिकाणी या बँकेच्या अधिकाऱ्याला सेक्स उत्तेजित करणारे इंजेक्शन ही देण्यात आले. तर काही इंजेक्शन आरोपीने स्वतःला लावून घेतले. यावेळी या दोन आरोपीनी आणखी काही साथीदारांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. बँकेच्या त्या अधिकाऱ्यांसोबत या दोघांनी सेक्स करतानाचे गुपचूप व्हिडिओ त्यावेळी काढले. हीच चुक त्या बँकेच्या उच्च अधिकाऱ्याला घातक ठरली. त्या दोन्ही आरोपींनी पुढे तो व्हिडीओ त्या बँक अधिकाऱ्याला पाठवला. शिवाय व्हायरल करण्याची धमकी ही दिली. त्यामुळे बँक अधिकारी घाबरून गेला होता.
त्या दोघांनी या बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. त्याच्याकडून 80 हजार रुपये उकळले. शेवटी या अधिकाऱ्याने खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आपल्या बरोबर झालेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. खदान पोलिसांनी मनीष नाईक आणि मयूर बागडे या दोघांना या प्रकरणी अटक केली आहे. दरम्यान या ॲपच्या माध्यमातून सोशल मीडियावर गैरवापर करून अनेकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असेही आवाहन खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी नागरिकांना केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world