योगेश शिरसाट
एकीकडे सर्वजण गणेश विसर्जनात तल्लीन असताना दुसरीकडे मात्र एक भयंक काडं अकोल्यात घडला आहे. अकोल्यात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचे कुटुंबीय विसर्जनासाठी गेले असता तिच्याच घरात घुसून बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या प्रकरणी तौहिद समीर बैद या आरोपी विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तौहिद याने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत काल शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली. पीडित मुलीचे सर्व नातेवाईक गणेश विसर्जनासाठी गेले होते. याच वेळी कोणी नसल्याचा फायदा घेत हा आरोपी पीडित अल्पवयीन तरुणीच्या घरी आला. तेव्हा पीडीतीचा मानलेला भाऊ हा त्या ठिकाणाहून जात होता. आरोपीचा आणि पिडीतेचा आवाज त्याला आला. तेव्हा त्यांने आरोपीला हटकले. तर आरोपीने जवळील चाकू काढून त्याला धाक दाखवला. तेवढ्यातच आजूबाजूचे लोक काय झालं हे पाहाण्यासाठी धावले,
त्यांनाही आरोपीने चाकूचा धाक दाखवला. यावेळी आरोपी 24 वर्षीय तौहिद समीर बैद याच्या तावडीतून ती पीडित मुलगी सुटली. त्यानंतर घाबरलेल्या स्थितीत ती जवळच असलेल्या एका घरात लपली. तेव्हा मुलीच्या पाठीमागे आरोपी गेला. त्याने तिला चाकूचा धाक दाखवून जबरी शारीरिक शोषण केलं. ही तरुणी फक्त सोळा वर्षांची आहे. यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच याबाबतची माहिती नातेवाईकांना दिली तर तुझ्या आई वडील भाऊ यांनाही मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी शोषण करून तिथून निघून गेला. यानंतर पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर तिला पीडीतीने सर्व हकीकत सांगितली.
नवऱ्याची मेहनत, बायकोचा विश्वासघात! लायब्ररी विकून पत्नीला शिकवले, पोलीस होताच तिने....
दरम्यान अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को'सह विविध कलमानुसार अंतर्गत गुन्हे दाखल केले. या प्रकरणानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात जमा होऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तौहिद याला बेड्या ठोकण्यासाठी एक पथक तयार केले आहे. आरोपीने यापूर्वीही रामदास पेठ पोलीस स्टेशन आणि इतर अनेक ठिकाणी गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस कसून शोध घेण्यात येत आहे.