जाहिरात

नवऱ्याची मेहनत, बायकोचा विश्वासघात! लायब्ररी विकून पत्नीला शिकवले, पोलीस होताच तिने....

Wife left her husband after getting job : हरियाणाच्या पलवलमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जे उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित SDM ज्योती मौर्या आणि त्यांचे पती आलोक मौर्या यांच्या केससारखे आहे.

नवऱ्याची मेहनत, बायकोचा विश्वासघात! लायब्ररी विकून पत्नीला शिकवले, पोलीस होताच तिने....
Wife left her husband : या प्रकरणात पीडित पतीनं तक्रार केली आहे..
मुंबई:

Wife left her husband after getting job : ते दोघं लायब्ररी पहिल्यांदा भेटले. तो लायब्ररी चालवत होता. दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेम झालं. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. लग्नानंतर तिनं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. नवऱ्यानं तिला भक्कम पाठिंबा दिला. शिक्षणासाठी स्वत:चं ग्रंथालय आणि काही जमीन देखील विकली. पण, त्यानंतर असं काही घडलं की त्यानं कधीही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 

हरियाणाच्या पलवलमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जे उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित SDM ज्योती मौर्या आणि त्यांचे पती आलोक मौर्या यांच्या केससारखे आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आणि विवाहित असूनही ही गोष्ट लपवून दिल्ली पोलिसात नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

पलवलमधील बडोली गावातील रहिवासी असलेला 26 वर्षांचा पीतम, त्याने 2021 मध्ये एक लायब्ररी सुरू केली होती जेणेकरून तरुण सरकारी नोकरीची तयारी करू शकतील. याच लायब्ररीमध्ये त्याची ओळख राजीव नगरमधील एका मुलीशी झाली. हळूहळू दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पीतमने आपल्या कुटुंबालाही या नात्याबद्दल सांगितले.

4 जानेवारी 2023 रोजी त्यांनी बल्लभगढ येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले. लग्नानंतर ते एका फ्लॅटमध्ये राहू लागले. त्याच वेळी, त्यांच्या पत्नीने दिल्ली पोलिसातील भरतीसाठी अर्ज केला. पीतमने सांगितले की, आपल्या पत्नीच्या शिक्षणाचा आणि तयारीचा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. ही गरज पूर्ण करण्यासाठी त्याने आपली लायब्ररी आणि काही जमीन विकली. त्याने आपल्या पत्नीला लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट या दोन्हीमध्ये मदत केली. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याच्या पत्नीला दिल्ली पोलिसातील प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.

( नक्की वाचा : 'हात खाली कर'! 100 सेकंदांत 60 थप्पड; कॉलेज कॅम्पसमधील मारहाणीचा Video Viral )
 

प्रशिक्षण संपलं आणि...

पीतमचा आरोप आहे की त्याच्या पत्नीने पडताळणीदरम्यान (verification) स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले, तर ते विवाहित होते. त्याला ही गोष्ट नंतर कळली. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर त्याची पत्नी थेट माहेरी निघून गेली आणि तिने पीतमशी कोणताही संपर्क ठेवला नाही. पीतम त्याच्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला, तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी सामाजिकरित्या लग्न न झाल्याचे कारण देत मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास नकार दिला. त्याच्या पत्नीनेही त्याच्यासोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिला.

पीतमने या फसवणुकीबाबत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली येथे तक्रार दाखल केली आहे. पत्नी घटस्फोटासाठी दबाव टाकत असल्याचा दावा त्यानं केला. त्यानं दिल्ली पोलीस आयुक्तांकडंही तक्रार केलीय. त्यामध्ये पत्नीनं लग्नाची माहिती लपवली असल्याचं त्यानं स्पष्ट केलंय.

इतकंच नाही तर पीतमनं पत्नीला परत आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे आणि सेक्शन 9 अंतर्गत याचिका दाखल केली आहे, ज्याची सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com