
पालघर: साखरपुडा झाल्यानंतर शरीर संबंधास नकार दिल्याने भावी पतीनेच होणाऱ्या अल्पवयीन पत्नीची अत्याचार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली आहे. भावी पतीनेच दुष्कर्म करून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जव्हार पोलिसांनी सुत्रे हलवत कोणतेही पुरावे नसताना आरोपीला जेरबंद केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जव्हार तालुक्यातील बिबलधार गावातील एका अल्पवयीन मुलीवर शरीर संबंधसा नकार दिल्याने लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून करून आरोपी गावा लगतच्या जंगलात पळून गेला होता. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी जंगलात शोध मोहीम राबवत आरोपी निलेश धोंडगा याला अटक केली आहे. आरोपी निलेश आणि मयत अल्पवयीन मुलीचे लग्न ठरले होते. त्यामुळे आरोपीचे मयत मुलीच्या घरी येणे-जाणे सुरु होते.
नवऱ्याची मेहनत, बायकोचा विश्वासघात! लायब्ररी विकून पत्नीला शिकवले, पोलीस होताच तिने....
बुधवारी संध्याकाळी मयत मुलीचे आई वडील शेतावरून घरी आले असता त्यांची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आले, ती कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्यांनी तीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती, तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती जव्हार पोलिसांना देण्यात आली, जव्हार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मयत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.
मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासा दरम्यान दुपारच्या वेळी मयत मुलीच्या घरी आरोपी निलेश धोंडगा आल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. माहिती नुसार आरोपीचा शोध घेतला असता आरोपी जंगलात पळून गेल्याचे समोर आले, त्यानंतर पोलिसांनी जंगलात शोध मोहीम राबवत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
( नक्की वाचा : 'हात खाली कर'! 100 सेकंदांत 60 थप्पड; कॉलेज कॅम्पसमधील मारहाणीचा Video Viral )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world