जाहिरात

Akola News : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरणासाठी दबाव; महिलेच्या तक्रारीने अकोला हादरलं!

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Akola News : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरणासाठी दबाव; महिलेच्या तक्रारीने अकोला हादरलं!

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका पीडित महिलेने अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारीनुसार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला मानसिक त्रास देण्यात आला, तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून संपूर्ण प्रकरणामुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे.

विश्वासाचा गैरवापर : ओळखीचे रूपांतर ब्लॅकमेलिंगमध्ये अन् नंतर..

दरम्यान शहरातील पीडित महिला नियमितपणे संबंधित कॉस्मेटिक दुकानातून साहित्य खरेदी करत होती. दुकान मालकाशी ओळख वाढल्यानंतर “नवीन प्रॉडक्ट्सचे फोटो पाठवतो” असे सांगत आरोपीने तिचा मोबाईल नंबर घेतला. पुढे महिलेच्या पतीची चारचाकी गाडी आरोपी दुकानदाराने खरेदी केल्याने त्याच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला. याच दरम्यान, मात्र एका दिवशी दुकानात व परिसरात कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने महिलेची छेड काढत नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ असल्याचे सांगत आरोपीच्या दोन मित्रांनी महिलेचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. बदनामी टाळण्यासाठी महिलेने तब्बल पाच लाख रुपये दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


नक्की वाचा - Viral: 'दारुसोबत बटाटा चिप्स पण ठेवा'; सरकारी अधिकाऱ्याच्या घरातून निघताना चोराने लिहिला मेसेज, प्रकरण व्हायरल

धर्मांतराचा दबाव आणि पोलिसांची कारवाई

ब्लॅकमेलिंगमध्ये एकूण चार आरोपी सहभागी असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धर्मांतराची अट घालण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी महिलेवर अतिप्रसंग व शारीरिक अत्याचार केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद आहे. यावरून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली असून, त्यातील एक आरोपी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आणखी धक्कादायक बाबी समोर येणार का, याकडे संपूर्ण अकोला शहराचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com