Akola News: शिक्षकाच्या लाचखोरीचा भांडाफोड! 'उंच उडी'ची चर्चा अन् ACB ची कारवाई, पण न्यायालयात...

मागील आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान अकोला जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मारलेली “उंच उडी” संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.पण नंतर असं काही घडलंय..

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Teacher Bribe Case Latest Update

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Bribe Case Latest Update :  मागील आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान अकोला जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मारलेली “उंच उडी” संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.पण या उंच उडीमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईचा बडगा उगारेल,याची जराही कल्पना त्या शिक्षकाला नसेल. काही दिवस 'सरकारी पाहुणचार'मिळणार,अशा चर्चा सुरु असतानाच अकोला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील लाचखोरी उघडकीस आली.अकोला एसीबीच्या पथकाने एका कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती. परंतु, अकोल्याच्या न्यायालयाने शिक्षकाची निर्दोष सुटका केल्याचा निर्णय दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आंतरजातीय विवाह अनुदानात लाचखोरीचा पर्दाफाश

राज्य शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला.या प्रकरणात शैलेंद्र बगाटे हा खासगी शिक्षक असून तो एजंट म्हणून काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

नक्की वाचा >> Pune News: थोडी तरी लाज बाळगा! परदेशी पाहुण्यांनी पुणेकरांना रस्त्यावरच रोखलं, Video होतोय व्हायरल

आंतरजातीय विवाह केलेल्या एका तक्रारदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात अर्ज दाखल केला होता.मात्र बराच कालावधी उलटूनही अनुदानाची रक्कम न मिळाली नाही. त्यामुळे चौकशी सुरु करण्यासाठी तो या विभागात गेला. त्यावेळी आरोपीने काम करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली.तडजोडीनंतर पहिला हप्ता म्हणून 3 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले आणि त्यानुसार एसीबी पथकाने सापळा रचला आणि शैलेंद्र बगाटे यांना अटक केली. 

न्यायालयीन प्रक्रिया आणि लाचखोरीचा नस्ती बंदचा निर्णय 

एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्हा परिषद कार्यालयासमोरच आरोपीला 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष 17 डिसेंबरला रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.तर दुसरीकडे आरोपीला अकोल्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयासमोर आज हजर करण्यात आले.

Advertisement

नक्की वाचा>> "सर्वच चुकीचे गातात..", धुरंधर अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याचे बोल आहेत तरी काय? खुद्द गायकाने सर्वच सांगितलं

सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.पी.डी.हातेकर यांनी बाजू मांडली,तर ॲड.जी.बी.गंगावते आणि ॲड.श्रीधर लोकरस यांनी कामकाज पाहिले.अखेर न्यायालयाने या लाचखोरीच्या प्रकरणात शैलेंद्र बगाटे यांना निर्दोष सुटका करत प्रकरण नस्ती बंद करण्याचा निर्णय दिला.