सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Shocking Video Viral : 'अति घाई आणि नियमांची पायमल्ली',हे चित्र पुणे-पिंपरीच्या रस्त्यांवर नवीन नाही.परंतु,सांगवी येथील रक्षक चौकात जे घडले,त्याने स्थानिक प्रशासनासह नागरिकांच्या शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी थेट फुटपाथवर दुचाकी चालवणाऱ्यांना काही परदेशी नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. या पाहुण्यांनी बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचे धडे दिले. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सांगवी परिसरातील रक्षक चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. या समस्येतून सुटका करण्यासाठी अनेक दुचाकीस्वार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. हे बेशिस्त चालक पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून गाड्या चालवतात. होते.हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर काही परदेशी पर्यटकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता,स्वतः रस्त्यावर उतरून या दुचाकीस्वारांना शिस्त काय असते, ते दाखवून दिलं.
नक्की वाचा >> Kalyan News: 35 कोली गांजासह देशी कट्टा सापडला, पोलिसांचा तस्करांना सिनेस्टाईल दणका, 8 जणांना अटक, 6 फरार
"हा रस्ता चालण्यासाठी आहे, वाहतुकीसाठी नाही"
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की,हे परदेशी नागरिक अत्यंत शांतपणे पण ठामपणे दुचाकीस्वारांना फुटपाथवरून खाली उतरण्यास सांगत आहेत. हा रस्ता चालण्यासाठी (Pedestrians) आहे, वाहन चालवण्यासाठी नाही,अशी समज त्यांनी या चालकांना दिली.परदेशी पाहुण्यांचा हा पवित्रा पाहून अनेक दुचाकीस्वारांची भंबेरी उडाली,तर काहींनी शिस्तीचे पालन करत आपली वाहने मुख्य रस्त्यावर घेतली.
— Naresh Shende (@NareshShen87640) December 18, 2025
सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या मानसिकतेवर जोरदार टीका केली आहे.
* बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना आपल्याला शिस्त शिकवावी लागते, ही लज्जास्पद बाब आहे,असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
* पोलिसांना दोष देण्यापेक्षा, नागरिकांनी स्वतःहून नागरी शिस्त पाळली असती तर ही वेळ आली नसती, असेही मत व्यक्त काहींनी व्यक्त केलंय.
वाहतूक पोलिसांसमोर आव्हान
रक्षक चौकातील या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस तैनात असतानाही दुचाकीस्वार सर्रास फुटपाथचा वापर कसा करतात ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. परदेशी पाहुण्यांनी दाखवलेला हा 'आरसा' पिंपरी-चिंचवडकरांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरेल का ? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world