जाहिरात

"सर्वच चुकीचे गातात..", धुरंधर अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याचे बोल आहेत तरी काय? खुद्द गायकाने सर्वच सांगितलं

धुरंधर सिनेमानं 2 आठवड्यामध्येच बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. 500 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या सिनेमाच्या ‘फस्ला’ (Fa9la) या गाण्याने तर चाहत्यांना वेडच लावलं आहे.

"सर्वच चुकीचे गातात..", धुरंधर अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याचे बोल आहेत तरी काय? खुद्द गायकाने सर्वच सांगितलं
Dhurandhar Akshaye Khanna Fa9la Song Pronunciation

Dhurandhar FA9LA Song : धुरंधर सिनेमानं 2 आठवड्यामध्येच बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. 500 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या सिनेमाच्या ‘फस्ला' (Fa9la) या गाण्याने तर चाहत्यांना वेडच लावलं आहे. या गाण्यावर अक्षय खन्नाचा रेहमान डकैतचा लूक दाखवण्यात आला आहे. गाण्यात अक्षय खन्नाचा ऑल ब्लॅक लूक,डान्स आणि मजेदार एक्सप्रेशन्स गाण्याची शान वाढवताना दिसतो. या गाण्याचे भन्नाट रिल्स बनवून संपूर्ण भारतात व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर स्क्रोल केल्यावर या गाण्याची रिल अनेकदा पाहायला मिळते. गाण्याचे बोल नीट समजत नसले तरी त्याची ट्यून फुल एंटरटेनिंग वाइब्स देते.

‘फस्ला'हे गाणं सध्या सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.हे गाणं बहरीनच्या सिंगर आणि रॅपर फ्लिपराची यांनी 2024 मध्ये गायले होते आणि आता त्याचे बॉलिवूड व्हर्जन जगभरात लोकप्रिय झाले आहे. या गाण्यातील Fa9la मधील ‘9' कसे उच्चारायचे, याबाबत खुद्द फ्लिपराची यांनी माहिती दिलीय.एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत फ्लिपराची म्हणाले, Fa9la मधील ‘9' म्हणजे ‘स' असा अर्थ आहे.बाकी शब्द स्पष्ट ऐकू येतात.Fa9la चा हिंदी अर्थ ‘फस्ला' आहे.

नक्की वाचा >> Pune News: थोडी तरी लाज बाळगा! परदेशी पाहुण्यांनी पुणेकरांना रस्त्यावरच रोखलं, Video होतोय व्हायरल

"लोकांना बोल समजत नाहीत, पण या गाण्याची ट्यून.."

या गाण्याला फिल्ममध्ये घेतल्यावर फ्लिपराची म्हणाले,“गाणं फिल्मचा भाग झालं आणि आता परिणाम सगळ्यांसमोर आहे.”गायक भारतात या गाण्याच्या यशामुळे खूप आनंदी आहेत. ते म्हणाले,“अरबी हिप-हॉप गाणं जे आता जगभरात प्रसिद्ध होत आहे,यापेक्षा मोठी गोष्ट नाही. खरं सांगायचं तर मला वाटलं नव्हतं की हे गाणं इतकं फेमस होईल.लोकांना बोल समजत नाहीत.पण या गाण्याची ट्यून अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. लोकांसाठी ही एक मनोरंजनाची धून बनली आहे.”

नक्की वाचा >> Kalyan News: 35 कोली गांजासह देशी कट्टा सापडला, पोलिसांचा तस्करांना सिनेस्टाईल दणका, 8 जणांना अटक, 6 फरार

र्ल्डवाइड 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई

बहरीनच्या रॅपरने पुढे म्हटलं,“हो, या गाण्यात इंडियन फ्लेवरही घातला आहे.पण मला वाटलं नव्हतं की हे इतकं गाजेल.” या गाण्यामुळे फिल्मच्या यशाबद्दल रॅपर म्हणाले, “फिल्म खरोखरच जगभरात कमाल करत आहे. फक्त भारतातच नाही तर जगातील प्रेक्षक हा हिंदी सिनेमा पाहत आहेत.हा सिनेमा लोकांच्या एंटरटेनमेंट लिस्टमध्ये टॉपवर आहे.” 5 डिसेंबरला प्रदर्शीत झालेला ‘धुरंधर'हा सिनेमा आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे.या सिनेमात रणवीर सिंह, अक्षय खन्ना,संजय दत्त,अर्जुन रामपाल,आर.माधवन आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.या सिनेमानं वर्ल्डवाइड 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारतात या सिनेमानं 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com