अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांकडून संताप, पण कारण काय? 7 मुद्द्यांमधून समजून घेऊया

अनेकांनी या घटनेचं स्वागत केलं आहे. तर विरोधकांसह अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Advertisement
Read Time: 5 mins
बदलापूर:

Akshay Shinde encounter : बदलापुरातील दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे यांच्याविरोधात बदलापुरात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याची पहिली पत्नी हिनेही तक्रार नोंदवली होती. त्यामुळे प्रकरणाला बळ आलं होतं. मात्र 23 सप्टेंबर रोजी झालेल्या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या घटनेचं स्वागत केलं आहे. तर विरोधकांसह अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या वकील प्रियेश जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे. असा न्याय अपेक्षित नव्हता असं ते यावेळी म्हणाले. त्याशिवाय विरोधकांकडूनही सरकारला घेरलं जात आहे. (Akshay Shinde encounter reaction) कुणाला तरी लपवण्यासाठी हा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पण का केला जातोय हा विरोध? 10 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया..

1. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडिमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘ दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून, पोलिसाच्या होस्टरमध्ये ठेवलेलं पिस्तुल खेचून गोळीबार कसा करू शकतो?' याचं उत्तर पोलिसांन दिलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या(शिवसेना) पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केल्याचा दाखलाही अंधारे यांनी दिला. ‘ पोलिसांना त्यांचं काम करू द्यायला पाहिजे, कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं.  याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे' अशी मागणीही शिरसाट यांनी केल्याचे अंधारे यांनी नमूद केले. अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता. अक्षय शिंदे तळोजामधून बदलापुरमध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली? ज्या पिस्तुलाने अक्षय वर गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. अक्षय शिंदे याला पिस्तूलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढू शकतो. संजय शिरसाट यांनी या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. अक्षय शिंदे गतिमंद होता असे पोलिसांनी सांगितलं होतं, तर मग तो एवढा हुशार कसा निघाला?

2 अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हाथ होता. प्रदीप शर्मा यांच्या ते जवळचे होते. ते सस्पेंड होते. ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालते त्याबद्दल आम्हाला विश्वास नाही. २४ तासात घटनेची माहिती मानवाधिकार यांना दिली पाहिजे. अक्षय शिंदे प्रकरणावर आम्ही कोर्टात जाणार असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. 

नक्की वाचा - 'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र 

3 अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून आदित्य ठाकरेंनी अनेक सवाल उपस्थित केले. बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? त्यांना भाजप-मिंधे राजवट का संरक्षण देत आहे? मिंधेच्या स्थानिक चॅपचे काय? वामन म्हात्रे यांनी एका पत्रकाराला प्रश्न विचारला की, ती स्वतःवर बलात्कार झाल्यासारखं घटनेबद्दल का विचारत आहेस. त्याला संरक्षण का दिले जातंय? आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेणार का? त्यांना गुंडांसारखी वागणूक दिली जात होती. एक आठवडाभर पीडितेची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिल्याने ते फक्त निषेध करत होते. पोलीस स्टेशन कोणाचं संरक्षण करीत होतं? शाळेच्या विश्वस्तांचा भाजपशी संबंध असल्याचे समजते. आणि त्यांचे संरक्षण केले जात आहे. ते खरे आहे का? सरकार उत्तर देईल का?

4 संजय राऊतांनी सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले...
- शंका घ्यावा असाच प्रकार आहे, एखादा अपवाद वगळता एन्काऊंटर खरी नसतात.
- ही घटना घडली तेव्हा बदलापूरमधील जनता रस्त्यावर उतरली होती.
- आरोपीला आमच्या हातात द्या, ही मागणी जनतेकडून केली जात होती.
- तेव्हा गृहमंत्र्यांनी असं करता येणार नाही, म्हणून सांगितलं. 
- अक्षय शिंदे आणि संचालक असं रॅकेट आहे
- जनतेवर दाखल केलेले गुन्हे ही मागे घ्या.
- आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, हातात बेड्या आहेत, मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसा चालवतो?
- संडास साफ करणारा मुलगा गोळ्या कसा घालतो ?


- कुणालातरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं आहे
- संस्थाचालक दोषी नसेल तर CCTV फुटेज का गायब केलं
- बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाले पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती.
- संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा का दाखल केला?
- आरोपीने आपल्या जबाबात काही खुलासे केले होते, म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला.
- कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. 
- मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आणि जामीनावर बाहेर आलेल्या एका एन्काऊंटर स्पेशालिस्टचा यात काय रोल आहे ? ते बघा

नक्की वाचा - 'असा न्याय अपेक्षित नव्हता', अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर पीडित चिमुरडीचे वकील असं का म्हणाले?

5 काय म्हणाले जयंत पाटील? 
तो मेला म्हणजे केस संपली असे समजू नये. संस्थेवर कारवाई करणे हा विषय शिल्लक आहे. गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. बदलापुरातील ज्या नराधमाने शाळेत जाणाऱ्या बालिकेवर अत्याचार केला, त्याची केस संस्थाचालक मानायला तयार नव्हते. पोलीस स्टेशनमध्येही टाळाटाळ केली जात होती. अक्षय शिंदेला फाशी झालीच असती. त्या संस्था चालकांची चौकशी का थांबली? तो बलात्कारी मेला याचे दुःख नाही, पण याचा एन्काऊंटर झाला म्हणून पोलीस स्टेशन आणि संस्थाचालक यांची चौकशी करावी. तो गेला म्हणजे प्रकरण संपले असे नाही. गुन्हा दाखल न करणाऱ्या त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. संस्थाचालक यांची चौकशी झाली पाहिजे. 

6 सुप्रिया सुळे म्हणाल्या..
बदलापूर येथील घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे दोन्ही हात बांधले आहेत तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला ? हा देश संविधानाने चालतो. काल जी घटना झाली त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुळेंनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

7 प्रकाश आंबेडकर
सरकारने वस्तुस्थिती समोर मांडवी अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे यायला हवा. मांडीला गोळी कशी लागली, समोरून गोळी मारली तर मांडीला कशी लागली हे समोर यायला हवं. या प्रकरणात संशयाला वाव मिळत आहे. त्या शाळेत अनेक प्रकार घडले आहेत. आरोपी ते ओपन करणार होता का? अनेक संशय आहेत त्यामुळे मेडिकल रिपोर्ट आणि सायंकाळच्या सुमारास कुठे घेऊन चालले होते याबद्दलची माहिती समोर यायला हवी.