जाहिरात

'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र 

Akshay Shinde Encounter : दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषणा व्यतिरिक्त अक्षय शिंदे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र 
बदलापूर:

Akshay Shinde Encounter : बदलापुरातील प्रसिद्ध शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने शाळेतील दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणाची दखल देशभरातून घेण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. 

आज ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमका घटनाक्रम सांगितला. दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषणा व्यतिरिक्त अक्षय शिंदे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासाठीही अक्षयला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून हलवण्यात येत होतं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपी अक्षय शिंदे याच्याविरोधात त्याच्या पहिल्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं होतं. या तपास पथकातील पोलीस अधिकारी न्यायालयाचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तेथून आरोपी अक्षय शिंदेला ठाण्याला घेऊन येत असताना आरोपीने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेतली. आणि पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  

Akshay Shinde Encounter : थंड बंदुकीतून 15 वर्षांनी सुटली गोळी अन् ठाणे पोलिसांचा धडाकेबाज इतिहास झाला जागा

नक्की वाचा - Akshay Shinde Encounter : थंड बंदुकीतून 15 वर्षांनी सुटली गोळी अन् ठाणे पोलिसांचा धडाकेबाज इतिहास झाला जागा

या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेने पोलिसांच्या दिशेने 3 राऊंड फायर केले, त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 2 राऊंड इतरत्र फायर झाले. संरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली. यात अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. अक्षय शिंदे याची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (Mumbra Devi temple)

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?

नक्की वाचा - Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?

एका पोलीस अधिकाऱ्याला पायाला गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. ज्युपिटर रुग्णालयात इतर पोलिसांवरही उपचार सुरू आहे. मुंब्रा-बायपासजवळ आई मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी ही घटना घडल्याची माहिती ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना धक्का, MUDA प्रकरणात होणार चौकशी! प्रकरण काय?
'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र 
Akshay Shinde encounter opponents angary what is reason understand in 7 points
Next Article
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांकडून संताप, पण कारण काय? 7 मुद्द्यांमधून समजून घेऊया