
बदलापुरातील (Badlapur News) शाळेत दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde encounter) याचा आज सायंकाळी एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर राज्यभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या घटनेचं कौतुक केलं आहे. बदलापुरात फटाके फोडण्यात आले तर अनेक महिलांना एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. मात्र बदलापुरात अन्यात झालेल्या त्या चिमुरडींच्या वकिलांनी मात्र हे कृत्य अमान्य केलं आहे.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल NDTV मराठीशी बोलताना पीडित चिमुरडीचे वकील प्रियेश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असा न्याय अपेक्षित नव्हता असं ते यावेळी म्हणाले. न्यायालयात त्याची ट्रायल सुरू होती. न्यायालयाकडून त्याला शिक्षा मिळाली असती. मात्र हे कृत्य अमान्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
कसा झाला अक्षयचा शेवट?
तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलीस निलेश मोरे यांची पिस्तुल हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला असे म्हटले जात आहे. त्यानंतर उरलेल्या पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world