- राजस्थानच्या अलवारमध्ये बँक अधिकाऱ्याच्या पत्नीने टॅक्सी चालक प्रियकरासोबत पतीची हत्या करण्याचा कट रचला होता
- पतीच्या हत्येचा कट एका ऑडिओ क्लिपमुळे उघड झाला, ज्यामुळे पोलिसांनी अर्चना अरोरा आणि ऋषभ शर्माला अटक केली
- अर्चना आणि ऋषभ यांच्यात प्रेमसंबंध होते व ते एकत्र राहून लग्न करण्यासाठी पतीला अडथळा मानत होते
पत्नीकडून पतीची हत्या करण्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या आहे. राजा रघुवंशी मर्डर केसने तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. त्यानंतर ही अशा घटना घडतच आहेत. अशीच एक घटना राजस्थानमधील अलवारमध्ये घडली आहे. अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बँक अधिकाऱ्याच्या पत्नीने आपल्या टॅक्सी ड्रायव्हर प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा 'डेथ प्लान' आखला होता. मात्र, एका ऑडिओ क्लिपमुळे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी पत्नी अर्चना अरोरा आणि तिचा प्रियकर ऋषभ शर्मा या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कटाची सर्वा माहिती त्यानंतर समोर आली.
पोलीस उपअधीक्षक अंगद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आणि ऋषभ यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या दोघांना एकत्र राहायचे होते. त्यांना लग्न ही करायचे होते. पण त्यात पती अडथळा ठरत होता. सुरुवातीला अर्चना घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली होती. त्यानंतर दोघांनी मिळून पतीचा काटा काढण्याचे नियोजन केले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना अटक केली. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या कट समोर आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
प्रियकरासाठी एका पत्नीने आपल्याच कुंकवाचा बळी घेण्याची तयारी केली होती. अर्चना अरोरा असे या आरोपी महिलेचे नाव असून तिचे टॅक्सी ड्रायव्हर ऋषभ शर्मासोबत सूत जुळले होते. त्यांच्या या 'लव्ह स्टोरी'मध्ये पती अडसर ठरत असल्याने त्यांनी त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला. या दोघांनी आधी घरातील मौल्यवान दागिने आणि पैसे घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर त्यांनी बँक अधिकारी असलेल्या पतीच्या हत्येचे नियोजन केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका ऑडिओ क्लिपमुळे पोलिसांपर्यंत या कटाची माहिती पोहोचली आणि पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world