- धार जिल्ह्यातील प्रियंकाने आपला पती देवकृष्णच्या खुनाचा कट रचल्याची घटना समोर आली आहे
- प्रियंका आणि तिच्या प्रियकराने देवकृष्णची हत्या करुन लुटीचा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला होता
- प्रियंका यांनी पोलिसांना खोटे तक्रार दिली होती की दरोडेखोरांनी घरात घुसून पतीची हत्या केली आहे
Dhar Murder Case Story: पत्नीने पतीचा खून करण्याच्या घटना अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. काही हत्या तर देशाला हादरवून ठरणाऱ्या ठरल्या आहेत. त्यात आणखी एक अशा हत्येची भर पडली आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ज्यात पत्नीने आपल्या पतीच्या निधनानंतर हंबरडा फोडला होता. तीच पत्नी अखेर पतीची मारेकरी निघाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रियंका नावाच्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पती देवकृष्णची हत्या घडवून आणली. या घटनेला लुटीचा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला. ही बाब ज्या वेळी समोर आली त्यावेळी संपूर्ण कुटुंब हादरून गेलं.
7 एप्रिल 2026 रोजी प्रियंका पुरोहितने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यात रात्री काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घरात घुसून पतीसह आपल्याला ओलीस ठेवले असं तिने सांगितलं होतं. प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने देवकृष्णची हत्या केली अशी तक्रार तिने पोलीसात दिली. शिवाय घरातील 3.5 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. राजोद पोलिसांनी सुरुवातीला लुटीचा गुन्हा दाखल केला. पण हा लुटीचा नाही तर अजून काही तरी वेगळा प्रकार असल्याच संशय पोलीसांना आला. त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान प्रियंका वारंवार आपले जबाब बदलत होती. ज्यामुळे पोलिसांचा संशय आमखी बळावला होता. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, चोरीला गेल्याचे सांगण्यात आलेले दागिने घरातच मिळून आले. तसेच घटनास्थळावरील पुरावे सांगत होते की, हा गुन्हा घरातीलच कोणाचे तरी काम आहे. पोलिसांनी प्रियंकाची कसून चौकशी केली. तिचे रेकॉर्ड तपासण्यात आले. शेवटी प्रियंकाने आपला गुन्हा कबूल केला. तिने ज्या पद्धतीने हा खून केला ते ऐकून पोलीस ही चक्रावून गेले. त्या मागचे कारण ही तेवढेच धक्कादायक होते. त्यामुळे कुटुंबीय तर संपूर्ण पणे कोलमडून गेले.
तपासात असे समोर आले की, देवकृष्ण आणि प्रियंका यांचा विवाह वयाच्या 15 व्या वर्षी म्हणजेच बालपणात झाला होता. मात्र, प्रियंकाचे राजगड येथील कमलेश पुरोहित नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांना एकत्र राहायचे होते. पण पती देवकृष्ण त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत होता. काही करून प्रियंकाला प्रियकर असलेल्या कमलेश सोबत लग्न करायचे होते. त्याच्या सोबत संसार थाटायचा होता. पण पती देवकृष्ण यामध्ये येत होता. त्यामुळे यावर उपाय काय असा विचार या दोघांनी केला. त्यातून त्यांनी हत्येचा कट रचला.
प्रियकर कमलेशने त्याचा मित्र सुरेंद्र याला देवकृष्णच्या हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे सुरेंद्रने घरात घुसून झोपेत असलेल्या देवकृष्णची हत्या केली. त्यानंतर त्याने प्रियंकाला दुसऱ्या खोलीत बांधून ठेवले जेणेकरून पोलिसांना हा लुटीचा प्रकार वाटेल. या प्रकरणी पोलिसांनी प्रियंका आणि कमलेशला अटक केली असून, फरार आरोपी सुरेंद्रचा शोध सुरू आहे. या कटात प्रियंकाही सहभागी होती. शिवाय पतीच्या हत्येनंतर ती सर्वांसमोर मोठमोठ्याने रडत होती. जणू आपल्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे असा दिखावा तिने केला. पण तिचे खरे रूप काही तासातच समोर आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world