Shocking news: टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात पत्नीने आखला पतीचा 'डेथ प्लान'! एक ऑडिओ क्लिप अन् खेळ खल्लास

अर्चना आणि ऋषभ यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या दोघांना एकत्र राहायचे होते. त्यांना लग्न ही करायचे होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

पत्नीकडून पतीची हत्या करण्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या आहे. राजा रघुवंशी मर्डर केसने तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. त्यानंतर ही अशा घटना घडतच आहेत. अशीच एक घटना  राजस्थानमधील अलवारमध्ये घडली आहे. अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बँक अधिकाऱ्याच्या पत्नीने आपल्या टॅक्सी ड्रायव्हर प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा 'डेथ प्लान' आखला होता. मात्र, एका ऑडिओ क्लिपमुळे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी पत्नी अर्चना अरोरा आणि तिचा प्रियकर ऋषभ शर्मा या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कटाची सर्वा माहिती त्यानंतर समोर आली. 

नक्की वाचा - Shocking news: लहानपणी लग्न, प्रेम मात्र दुसऱ्यावर, प्रेमाचा विळखा अन् क्रूर शेवट, हादरवून टाकणारं हत्याकांड

पोलीस उपअधीक्षक अंगद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आणि ऋषभ यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या दोघांना एकत्र राहायचे होते. त्यांना लग्न ही करायचे होते. पण त्यात पती अडथळा ठरत होता. सुरुवातीला अर्चना घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली होती. त्यानंतर दोघांनी मिळून पतीचा काटा काढण्याचे नियोजन केले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना अटक केली. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या कट समोर आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: आनंदाच्या सहलीचा भीषण शेवट! वॉटरपार्कच्या स्लाइडनं महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, भयंकर घडलं

प्रियकरासाठी एका पत्नीने आपल्याच कुंकवाचा बळी घेण्याची तयारी केली होती. अर्चना अरोरा असे या आरोपी महिलेचे नाव असून तिचे टॅक्सी ड्रायव्हर ऋषभ शर्मासोबत सूत जुळले होते. त्यांच्या या 'लव्ह स्टोरी'मध्ये पती अडसर ठरत असल्याने त्यांनी त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला. या दोघांनी आधी घरातील मौल्यवान दागिने आणि पैसे घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर त्यांनी बँक अधिकारी असलेल्या पतीच्या हत्येचे नियोजन केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका ऑडिओ क्लिपमुळे पोलिसांपर्यंत या कटाची माहिती पोहोचली आणि पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

नक्की वाचा - Trending News: 5 तास पाण्यात लपला, कमळाच्या देठाने श्वास घेत राहीला, पण शेवटी फिल्मी स्टाईल एन्ड