Ambarnath: 'तो' एक निर्णय महागात पडला! अंबरनाथच्या निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची 45 लाखांची फसवणूक

Stock market scam: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून चांगला परतावा मिळवण्याच्या आमिषाने अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त जीएसटी (GST) अधिकाऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Stock market scam: अंबरनाथ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबई:

Stock market scam: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून चांगला परतावा मिळवण्याच्या आमिषाने अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त जीएसटी (GST) अधिकाऱ्याची तब्बल 45 लाख रुपये रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या प्रकाश पाटील यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रकाश रामकृष्ण पाटील हे निवृत्त जीएसटी अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम चांगल्या परताव्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर त्यांनी 'जी ऐट आयसीआयसीआय ग्रुप' (G-Eight ICICI Group) आणि 'एल ऐट मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट' (L-Eight Motilal Oswal Stock Market) नावाच्या दोन ट्रेडिंग कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली. विशेष म्हणजे, या कंपन्यांची नावे शेअर मार्केटमधील प्रतिष्ठित आणि बड्या कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य साधणारी असल्यामुळे पाटील यांना आपली फसवणूक होत असल्याची कल्पना आली नाही.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
 

या दोन बोगस कंपन्यांमध्ये त्यांनी एकूण 45 लाख रुपये रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर, आरोपींनी त्यांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचे खोटे रेकॉर्ड तयार केले. एका अकाउंटमध्ये सुमारे 1 कोटी रुपये तर दुसऱ्या अकाउंटमध्ये 1.25 कोटी रुपये (rupaye) पेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे भासविण्यात आले.

कसे झाले उघड?

प्रकाश पाटील यांनी जेव्हा अकाउंटमध्ये जमा झालेली ही मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोन्ही बोगस कंपन्यांनी पैसे काढण्यासाठी त्यांना पुन्हा नव्याने काही रक्कम भरावी लागेल, असा सल्ला दिला. कंपन्यांकडून वारंवार होणारी टाळाटाळ आणि पैशांच्या मागणीमुळे पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी लगेच अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
 

या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. नागरिक आणि विशेषतः सेवानिवृत्त व्यक्तींनी अशा प्रकारच्या फसवणुकींना बळी पडू नये, असे आवाहन एसीपी शैलेश काळे यांनी केले आहे.

Topics mentioned in this article