
'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक म्हण आहे. काही घटनांसाठी ही म्हण चपखल बसते. अंबरनाथमधील एका अपघातातून पुन्हा एकदा हेच समोर आलं आहे. दररोज रस्ते अपघातात हजारो लोकांचा जीव जातो. त्यामुळे गाडी चालवताना अधिक सावध आणि सजग राहणं आवश्यक असतं. यातूनच एका तरुणाचा जीव वाचल्याचं समोर आलं आहे.
अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी एका मागोमाग एक दोन डंपर डावीकडे वळत असताना एक दुचाकीस्वार अचानक मागच्या डंपरच्या चाकाखाली आला. यात त्याच्या दुचाकीवरून डंपरची दोनही चाकं गेल्यानं दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार यातून सुखरूप बचावला.
नक्की वाचा - डेटिंग अॅप..., गप्पा..., सुंदर मुलीचा प्रेमळ आग्रह अन् व्यावसायिकाचे अडीच कोटी पाण्यात!
ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे. या घटनेनंतर डंपर मालकाने दुचाकीस्वाराला नुकसान भरपाई दिल्यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world