जाहिरात

Amravati News: 'तरुण दिसता' या एका कौतुकाने शेतकऱ्याचे 70 लाख पाण्यात; अमरावतीत हनी ट्रॅपचा प्रकार

Amravati Honey Trap Case : अमरावती जिल्ह्यातील एका 64 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 70 लाखांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Amravati News: 'तरुण दिसता' या एका कौतुकाने शेतकऱ्याचे 70 लाख पाण्यात; अमरावतीत हनी ट्रॅपचा प्रकार
Amravati News: सततच्या आर्थिक लुटीमुळे हा वृद्ध शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली होता. (प्रतिकात्मक फोटो)
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati Honey Trap Case : अमरावती जिल्ह्यातील एका 64 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 70 लाखांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ 10,000 रुपयांच्या एका साध्या मदतीपासून सुरू झालेला हा व्यवहार अखेर 70 लाखांच्या खंडणीवर जाऊन थांबला असून, या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:ची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी या शेतकऱ्याने आपली आयुष्यभराची पुंजी गेल्या 4 वर्षांत या लुटारूंच्या हवाली केली.

मोबाईलच्या दुकानात सुरू झालं मायाजाळ

पीडित शेतकरी अमरावती येथील एका मोबाईल शॉपमध्ये नेहमी जात असत. तिथेच त्यांची ओळख दुकानदार पती-पत्नीशी झाली. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी महिलेच्या पतीने शेतकऱ्याकडून 10,000 रुपये उसने घेतले आणि महिनाभरात ते परतही केले. त्यानंतर पती दुकानात नसताना महिलेने शेतकऱ्याकडे 10,000 रुपये मागितले. हळूहळू महिलेने शेतकऱ्याला आपल्या भावनिक जाळ्यात ओढले. तुम्ही अजूनही तरुण दिसता, माझा पती माझ्याशी नीट वागत नाही, असे सांगून तिने जवळीक वाढवली.

( नक्की वाचा : Nagpur News : जेवणात विभूती आणि महाराजांकडे राहण्याची सक्ती, नागपूरच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूचे कारण उघड! )

शेतात आणि घरी संमतीने शरीरसंबंध

मार्च 2020 मध्ये या महिलेने 64 वर्षीय शेतकऱ्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर नांदगाव पेठ हद्दीतील शेतात आणि घरी त्यांच्यामध्ये संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र, काही काळानंतर आपली चूक लक्षात आल्यावर जेव्हा शेतकऱ्याने हे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या दाम्पत्याचा क्रूर चेहरा समोर आला. माझा नवरा खूप डेंजर आहे, त्याला कळलं तर तो आपल्याला संपवून टाकेल, अशी भीती सुरुवातीला महिलेनेच शेतकऱ्याला घातली.

सीसीटीव्ही आणि स्पाय कॅमेऱ्याचा धाक

नोव्हेंबर 2020 मध्ये या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. महिलेच्या पतीने शेतकऱ्याला बोलावून सांगितले की, माझ्या दुकानात स्पाय कॅमेरा आहे आणि माझ्या पत्नीने तुमचे सर्व कॉल रेकॉर्ड केले आहेत. हे पुरावे तुझ्या पत्नीला आणि नातेवाईकांना दाखवून तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन, अशी धमकी त्याने दिली. 

सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हतबल झालेल्या शेतकऱ्याने तडजोडीची विनंती केली, तेव्हा आरोपीने सुरुवातीला 1 लाख रुपयांची मागणी केली. 3 डिसेंबर 2020 रोजी हा पहिला चेक वठवण्यात आला.

( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )

4 वर्षांत 70 लाखांची महालूट

हा केवळ सुरुवातीचा हप्ता होता. 30 नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 या 4 वर्षांच्या काळात या दाम्पत्याने शेतकऱ्याला वारंवार धमकावून 70 लाख रुपये उकळले. लुटीचा हा आकडा अत्यंत मोठा आहे:

  • आरोपींनी कधी 1 लाख, कधी 2 लाख तर एकदा थेट 10 लाख रुपयांचे धनादेश वठवून घेतले.
  • पीडित शेतकऱ्याकडून वेळोवेळी तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात उकळले गेले.
  • 4 वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 70 लाख रुपये या शेतकऱ्याकडून खंडणी म्हणून वसूल करण्यात आले.

मानसिक तणाव आणि पोलिसांची कारवाई

सततच्या आर्थिक लुटीमुळे हा वृद्ध शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली होता. बदनामीच्या भीतीने त्यांनी अनेक दिवस हा त्रास सहन केला, मात्र अखेर धीर एकवटून त्यांनी नांदगाव पेठ पोलिसांकडे धाव घेतली. पीआय दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या लुटारू पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com