जाहिरात

Amravati News : सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या खिचडीवर मारला डल्ला; अमरावतीतील 8 शाळांचा 'फ्रॉड गेम'

सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांची खिचडी खाल्ली तरी कुणी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमरावती महानगरपालिकांच्या आठ शाळांचा फ्रॉड उघड झाला आहे. ,

Amravati News : सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या खिचडीवर मारला डल्ला; अमरावतीतील 8 शाळांचा 'फ्रॉड गेम'

शुभम बायस्कर, प्रतिनिधी

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अमरावती महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून खिचडी वाटप करण्यात येते. मात्र सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली अशी कबुली खुद्द मुख्याध्यापकांनी पोर्टलवर सादर केलेल्या माहितीनुसार समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावती महापालिकेच्या आठ शाळांमधून हा प्रकार समोर आला आहे. सुट्टीच्या दिवशी खिचडी कोणी खाल्ली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे.  एवढेच नव्हे तर शाळांनी केलेल्या नोंदीच्या आधारे शाळांचे इंधन, भाजीपाल्याची देयके ऑनलाईन पद्धतीने जनरेट करण्यात येत असून शाळांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले जाते; परंतु बहुतांश शाळांनी शासकीय सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी आहार घेतल्याची नोंद पोर्टलवर केल्याचे दिसून आले. 

Ratnagiri News : संतापजनक! सासऱ्यानेच केला सुनेचा विनयभंग, सासऱ्याला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ

नक्की वाचा - Ratnagiri News : संतापजनक! सासऱ्यानेच केला सुनेचा विनयभंग, सासऱ्याला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ

हे प्रकरण उघडकीस आल्याने जिल्हा परिषद, मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक फसवणूक करणाऱ्या शाळांविरोघाक कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.   

शासकीय सुटीच्या दिवशी या शाळांनी केली उपस्थितीची नोंद

  • महापालिका मराठी शाळा, बेनोडा
  • महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3 जुनीवस्ती बडनेरा
  • महापालिका मराठी शाळा अकोली
  • संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर
  • महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर 20, नवाथे नगर
  • असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदनी चौक अमरावती
  • महापालिका उर्दू प्रायमरी स्कूल नंबर 5 फ्रेजरपुरा अमरावती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com