शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati Crime : अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती येथील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर कॉलेजमधीलच नर्सच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामसुंदर भुतडा यांनी महाविद्यालयातील एका नर्सला मेट्रन पदी बढती नेण्याचे आमिष देऊन 2022 पासून लैंगिक शोषण केले. एवढेच नव्हे तर नंतर या महिलेला तिच्या तरुण मुलीला शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठव अशी मागणी डॉ भुतडा यांनी केली, असा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने त्यांना नकार देताच या महिलेला नोकरीवरून कमी करण्यात आले. यानंतर महिलेने या घटनेची तक्रार नांदगावपेठ पोलीस ठाण्यात दिली. यावरून प्राचार्य शामसुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Dharashiv News :रात्री 12 वा. कलाकेंद्रावर धाड, बंद खोलीत सुरू होता धक्कादायक प्रकार, 5 केंद्रांवर मोठी कारवाई
महाविद्यालयानजीक असलेले डॉक्टर भुतडा यांच्या घराची पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आली. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्राचार्य भुतडा हे सध्या फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दहातोंडे यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे अध्यक्ष असलेल्या कॉलेजमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.