
देवा राखुंडे
वैष्णवी हगवणेचं प्रकरण समोर आल्यानंतर हुंडा घेणाऱ्यां विरोधात चिड निर्माण झाली आहे. लोकांचा राग पाहाता अशा घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा होती. पण तसं होताना दिसत नाही. वैष्णवी प्रकरणानंतर हुंड्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये ही असेच एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये विवाहीतेला बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन यायला सांगितले जात होते. त्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. ऐवढच काय तर विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तो कमी म्हणून की काय तिला उपाशी ठेवण्याचा ही प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना दौंड परिसरात घडली आहे. वैष्णवी किरण मोरे असं या पिडीत महिलेचे नाव आहे. ती 25 वर्षांची आहे. गेल्या पाच वर्षापासून हा छळ सुरू आहे. ती पती किरण मोरे याच्या सोबत दौंड गावचे हद्दीत SRPF गृप नं 7 इथं राहात होती. तिथेच तिच्याकडून एक लाखाची वारंवार मागणी केली जात होती. या सर्वाला कंटाळून तिने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर या पीडित माहितीने थेट दौंड पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर सासू सुमन सुरेश मोरे, सासरे सुरेश नागनाथ मोरे, पती किरण सुरेश मोरे, दिर नितीन सुरेश मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व जण मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळी मिया गावचे रहिवासी आहेत.
नेमकं काय घडलं ?
किरण मोरे आणि त्यांची पत्नी वैष्णवी हे दौंड तालुक्यातील एस आर पी एफ मध्ये राहत होते. वैष्णवीचे पती किरण मोरे हे बुलेट दुचाकी घेण्याकरिता वैष्णवीला माहेरहून 1 लाख रूपये घेऊन ये, असा सतत तगादा लावत होते. यावरून ते तिला सतत शिवीगाळ करीत असत.काही दिवसातच तिथे वैष्णवीची सासू-सासरे आणि दीर राहण्यासाठी आले.यावेळी वैष्णवीने ही बाब सासू, सासरे यांच्यासह दिर नितीन मोरे यांना सांगितली. मात्र या तिघांनीही किरण मोरे याचीच बाजू घेतली.
सासरचे वैष्णवीला वाद घालून शिवीगाळ करीत होते.तू एकलुती एक मुलगी असून देखील तुझे वडील 1 लाख रूपये का देवू शकत नाहीत, असे हिणवून तिला मानसिक व शाररीक छळ करत होते. शिवाय तिला उपाशी पोटी ठेवण्याचा उद्योगही सासरच्या लोकांनी केला, असा तिचा आरोप आहे. अखेर वैष्णवी ने या सर्व त्रासाला कंटाळून ही बाब आपले वडील बाळासाहेब अर्जुन चव्हाण याच्या कानावर घातली. त्यानंतर वैष्णवीने वडिलांसोबत थेट दौंड पोलीस स्टेशन गाठले. पती, सासू-सासरे आणि दिर या सर्वांविरोधात थेट गुन्हा दाखल केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world