सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपी अनुज थापनचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या अनुज थापनचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनुज थापनने पोलीस कोठडीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याला गंभीर अवस्थेमध्ये  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातली क्राइम ब्रांचच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते.

सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारा एक आरोपी अनुज थापन (32) याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीची प्रकृती गंभीर असल्याचं माहिती आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती आणि 8 मेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते.  यात एक आरोपी अनुज कुमार थापन यांनी पोलीस कोठडीत आज दुपारच्या वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला.