Youtuber Anurag Dobhal News: उत्तराखंडचा प्रसिद्ध ब्लॉगर अनुराग डोभाल (The UK07 Rider) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनुरागसंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अनुरागने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याने आपली फॉर्च्युनर कार ताशी 220 किमी वेगाने दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात अनुराग गंभीर जखमी झाला असून त्याच्या गाडीचा चुराडा झाला आहे. ही घटना गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लाइव्ह स्ट्रीममध्ये व्यक्त केल्या भावना
अपघातापूर्वी अनुराग इंस्टाग्रामवर लाइव्ह केले होतं. या व्हिडीओमध्ये तो अतिशय भावुक दिसत होता. तो म्हणाला, "आता माणसंच उरली नाहीत, कोणाला फोन करू? पुढच्या जन्मी फक्त प्रेम द्या..." गाडीचा वेग 200च्या पार गेल्यावर त्याने "फायनल ड्राइव्हवर जाऊया" असे म्हटले आणि त्याची गाडी उलटली. पोलिसांनी अनुरागला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे म्हटलं जातंय.

हादसे में घायल अनुराग डोभाल.
अनुराग डोभालचा आत्महत्येचा प्रयत्न
कौटुंबिक समस्या आणि मानसिक छळामुळे अनुराग डोभालने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अनुराग डोभाल हा देहरादूनचा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. तो बिग बॉस 17 मध्येही दिसला होता. "UK07 रायडर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग डोभालचा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
"मला जगण्यालायक सोडलं नाही" – अनुरागची पोस्टAnurag Dobhal (UK07 Rider) came live on Instagram, wherein he could be seen driving his car rashly. Calling it the last ride, Anurag ended the video abruptly, which seemed like a crash. He attempted su!c¡de, however he's safe, and hospitalized currently. pic.twitter.com/bJoLeDQHd5
— BBTak (@BiggBoss_Tak) March 7, 2026
अनुरागने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपली व्यथा मांडली होती. त्याने लिहिले की, "मागील वर्षापासून काही लोक माझा मानसिक छळ करत आहेत. त्यांनी माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले – माझे कुटुंब, आर्थिक ताकद आणि माझी नातीसुद्धा. माझ्याच जवळच्या लोकांनी मला इतका त्रास दिला की त्यांनी मला जगण्यालायक सोडले नाही. मी खूप लढण्याचा प्रयत्न केला".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world