जाहिरात

Anurag Dobhal VIDEO: "माझ्या मृत्यूला आई-वडील जबाबदार...", बिग बॉस फेम Youtuber ची अवस्था पाहून सुन्न व्हाल!

युट्युबर अनुराग डोभालने आपल्या पालकांवर आणि भावावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. आंतरजातीय विवाह केल्यामुळे पत्नी रितिकानेही साथ सोडली असून, नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा त्याने दोन तासांच्या व्हिडिओमध्ये केली आहे.

Anurag Dobhal VIDEO: "माझ्या मृत्यूला आई-वडील जबाबदार...", बिग बॉस फेम Youtuber ची अवस्था पाहून सुन्न व्हाल!

YouTuber Anurag Dobhal UK07 Rider VIDEO: प्रसिद्ध युट्युबर आणि 'बिग बॉस 17' फेम अनुराग डोभाल ऊर्फ UK07 Rider याने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या कुटुंबाकडून छळ आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे आपल्या पालकांनी आपल्याला घरातून बाहेर काढले असून आता जगण्याची इच्छा उरली नाही, असे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अनुरागने आपल्या युट्युब चॅनेलवर "The Last Message" या शीर्षकासह एक दोन तासांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो ढसाढसा रडताना दिसत असून त्याने आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

आंतरजातीय विवाहामुळे छळ?

अनुरागने गेल्या वर्षी मे महिन्यात आपली मैत्रीण रितिका हिच्याशी विवाह केला होता. मात्र, हे लग्न आंतरजातीय असल्याने त्याच्या कुटुंबाचा याला तीव्र विरोध होता. लग्नानंतर पालकांनी अनुराग आणि रितिकाला घरात घेण्यास नकार दिला. "लग्नाच्या सहा दिवस आधी पालकांनी मला सर्व काही एकट्याने सांभाळण्यास सांगितले. नातेवाईकांसमोर माझे पाय धरून माफी मागायला लावली. आई-वडिलांनी माझा इतका छळ केला की, ते म्हणाले 'आम्हीही सुखी राहणार नाही आणि तुलाही सुखी राहू देणार नाही'," असा आरोप अनुरागने केला आहे.

(नक्की वाचा-  Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)

"पत्नीने साथ सोडली, आता जगायचं नाही"

व्हिडिओमध्ये अनुराग अत्यंत नैराश्यात असल्याचे दिसत आहे. त्याने सांगितले की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर आणि प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर (सप्टेंबरमध्ये), आता रितिकानेही त्याला सोडल्याचा दावा अनुरागने केला आहे. "माझ्या मृत्यूला माझे आई, वडील, भाऊ कलम आणि श्रेया जबाबदार असतील. मी गेल्या पाच दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही. या व्हिडिओनंतर कदाचित मी गायब होईल," असे अनुरागने म्हटले आहे.

पाहा VIDEO

बिग बॉस 17 मुळे आणखी प्रसिद्धी

अनुराग डोभाल 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाल्यानंतर घराघरात पोहोचला होता. आपल्या 'ब्रो सेना' (Bro Sena) या फॅन बेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुरागच्या या व्हिडिओमुळे त्याचे लाखो चाहते चिंतेत आहेत. आयुष्यात इतका मोठा बदल होईल आणि आयुष्य असे उद्ध्वस्त होईल, असा कधी विचार केला नव्हता, असे तो व्हिडिओत म्हणाला.

(नक्की वाचा- मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)

चाहत्यांकडून मदतीचे आवाहन

अनुरागने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याचे चाहते त्याला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. अनेकांनी स्थानिक पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com