समाधान कांबळे, प्रतिनिधी
Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अंत्यविधीनंतर मृत महिलेच्या अस्थी स्मशानभूमीतून गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.काही दिवसांपूर्वी पुसेगाव येथील लक्ष्मी धामने या महिलेचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी स्मशानभूमीत गेले अन्..
त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी स्मशानभूमीत गेले मात्र त्या ठिकाणी त्यांना धक्कादायक बाब समजली आणि अस्थी गायब झाल्याचे संपूर्ण गावभर ही बातमी पसरली.दरम्यान या घटनेनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लक्ष्मी धामने या महिलेचा मृत्यू अमावस्येच्या दिवशी झाल्याने आणि अस्थी त्याच दिवशी गायब झाल्यामुळे काहींनी विविध शक्यता व्यक्त केल्या आहेत.
नक्की वाचा >>Trending Video: 'ती' वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदाच गेली अन् व्हिडीओ बनवायची वेळ आली, सर्वच झाले थक्क
अस्थी गायब करण्याचं कारण काय?
कोणीतरी दागिन्यासाठी अस्थी चोरी केल्या असाव्यात गावात चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान,नेमक्या कोणत्या कारणामुळे अस्थी गायब झाल्या याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.या संदर्भात नरसी नामदेव पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर सत्य काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.