अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Farm Viral News : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोलवडी-साष्टे गावात शेतजमिनीच्या वादातून मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दोन जेसीबीच्या सहाय्याने शेतातील ऊस,सिताफळ बाग आणि इतर फळझाडांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.यावेळी शेतात काम करणाऱ्या महिलांना शिविगाळ,दमदाटी आणि मारहाण करण्यात आल्याचाही गंभीर आरोप आहे.ही घटना कोलवडी-साष्टे ग्रामपंचायत हद्दीत घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी दिपाली किरण साळुंके यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार रोहित मोडक,रा. हडपसर आणि त्याच्यासोबत असलेल्या सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार दिपाली साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शेतात खुरपणीचे काम करत असताना अचानक दोन जेसीबी आणि काही जणांचा समूह शेतात आला.
नक्की वाचा >>Snake Village Of India: महाराष्ट्रात आहे सापांचं गाव, नागही आरामात फिरतात, 'त्या' ठिकाणाची आहे मोठी खासीयत
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ऊस पीक जमिनदोस्त करण्यात आले. तसेच जवळपास 200 सिताफळ झाडे,आंब्यांची झाडे,ठिबक सिंचनाची पाइपलाइन आणि वीज कनेक्शनचीही तोडफोड करण्यात आली.या घटनेमुळे शेतकरी कुटुंब भयभीत झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.
नक्की वाचा >> Ratnagiri News: मुंबईचा तरुण रत्नागिरीत मूळ गावी आला अन् भयानक घडलं, सख्ख्या बहिणीने पोलीस स्टेशनच गाठलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world