जाहिरात

Ashwini Bidre : अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट, आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप; 9 वर्ष जुन्या प्रकरणात अखेर न्याय

ही घटना आहे 2016 ची. महाराष्ट्र पोलीस दलातील एक महिला अधिकारीचं (ASI) अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. यानंतर हत्या करणाऱ्याने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि समुद्रात फेकुन दिले.

Ashwini Bidre : अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट, आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप; 9 वर्ष जुन्या प्रकरणात अखेर न्याय
अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर

Ashwini Bidre and Abhay Kurundkar Case : 2016 साली नवी मुंबईतील बेपत्ता पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हिची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात निकाल देण्यात आला. 

नवी मुंबईतील बेपत्ता पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची निघृणपणे हत्या करीत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यांच्या मृतदेहाचे काही तुकडे समुद्रात फेकून देण्यात आले होते. तर मृतदेहाचा धड फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. यातून आरोपीचं पितळ उघड पडलं. आणि या हत्येचा सुगावा लागला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईतील बेपत्ता पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला त्याच्या मित्रांनी मदत केली होती. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आतापर्यंत अभय कुरूंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली आहे.  
महेश फळणीकरने पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितले की, 11 एप्रिल 2016 रोजी वरील चौघा आरोपींनी एकत्र येत बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर लाकूड कापायच्या कटर मशिनने अश्विनी यांच्या शरीराचे बारीक तुकडे केले व ते वसईच्या खाडीत फेकले. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वीच हा गुन्हा उघडकीस आणला होता. मात्र, आरोपी कबुली देत नसल्याने तपास रेंगाळला होता. तसेच मुख्य आरोपी स्वत: पोलीस निरीक्षक असल्याने पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला होता. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला व नंतरच या हत्येचा उलगडा झाल्याचा दावा राजू गोरे यांनी केला आहे. 


अशी झाली अश्विनी बिद्रेंची हत्या

 
- 42 वर्षीय बिद्रे नवी मुंबई पोलिसांच्या मानवाधिकार विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या. ब्रिदे 11 एप्रिल 2016 पासून बेपत्ता होत्या  
- 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरूंदकराला पोलीस ठाण्यात भेटायला गेल्या होत्या.
- यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाला.
- याच दरम्यान कुरूंदकराने बिद्रे यांची कारमध्ये गळा दाबून हत्या केली. त्यावेळी त्याच्यासमवेत महेश फळणीकर असल्याचे आता समोर आले आहे.
- ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. 
- ज्या वेळेस बिद्रे यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्याचे दाखवत आहे. त्याचवेळी अभय कुरूंदकरने त्याचा साथीदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा भाचा राजू पाटील याला फोन केल्याचे दाखवत आहे.
- त्यावेळी राजेश पाटील हा भाईंदरमधील एका बारमध्ये दारू पित बसला होता व कुरूंदकराने फोन करताच तो त्यांना भेटायला गेला.
- यानंतर कुरूंदकर, फळणीकरने राजू पाटील सोबत घेतले व मध्यरात्री अश्विनी बिद्रेचा मृतदेह कारमधून वसईच्या खाडीत फेकला. या वेळी खासगी कार चालक कुंदन भांडारी सोबत होता.

Solapur News : मेंदूविकारतज्ज्ञ शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, रुग्णालयातील महिला अधिकारीला अटक

नक्की वाचा - Solapur News : मेंदूविकारतज्ज्ञ शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, रुग्णालयातील महिला अधिकारीला अटक

लग्नासाठी तगादा लावल्याने संपविले अश्विनी बिद्रेला
 

- अश्विनी बिद्रे पोलिस दलात 2005 साली रूजू झाली. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली. 
- पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते. त्यांना मुलंही होती.
- कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे तिने पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते. 
- यानंतर अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. 
- मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव रचला.
- यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीला संपवून टाकले. या प्रकरणात या दोघांना राजू पाटील आणि कारचालक कुंदन भंडारी यांनी साथ दिली.
- अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून हत्या केली व महेश फळणीकर व राजू पाटीलच्या मदतीने वसई- भाईंदरच्या खाडीत फेकत त्याची विल्हेवाट लावली. 
- अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. कुरूंदकरला पत्नी व दोन मुलेही आहेत.