'इंजिनीयर लेक कायमची गेली, आता...'; पुणे अपघातात जीव गमावणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाचा शोक अनावर 

इंजिनीयर अश्विनी हृदयात स्वप्न साठवून पुण्यात दाखल झाली, तेव्हा आई-वडिलांच्याही डोळ्यात लेकीबद्दल अभिमान होता. मात्र आता त्याच डोळ्यात लेकीच्या कायमच्या दुराव्याचे अश्रू आहेत.   

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

अश्विनीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडून होता. दोघेही वाढदिवसाच्या पार्टीवरुन घरी परतत होते. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने कवटाळलं. पुण्यात झालेल्या अपघातात त्या दोघांचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला. दारूच्या नशेत दोन कोटींची पोर्शे कार चालविणारा आणि या दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन सुटका करण्यात आली. मात्र दबाव वाढल्यानंतर पोलीस सक्रिय झाले. अश्विनी आणि अनिश दोघेही मध्यप्रदेशातील जबलपूरमधील होते. अभ्यासात हुशार असलेली अश्विनी आयटी इंजिनियर झाली आणि नोकरी करण्यासाठी पुण्यात दाखल झाली. 

पुण्यात पोर्शे कार अपघातात जीव गमावणारी अश्विनी जबलपूरच्या अश्विनी कोष्टा येथील होती. अश्विनीचा मृत्यू कुटुंबीयांना मोठा धक्का आहे. इंजिनीयर अश्विनी हृदयात स्वप्न साठवून पुण्यात दाखल झाली, तेव्हा आई-वडिलांच्याही डोळ्यात लेकीबद्दल अभिमान होता. मात्र आता त्याच डोळ्यात लेकीच्या कायमच्या दुराव्याचे अश्रू आहेत.   

अश्विनीचे वडील सुरेश कोस्टा यांनी रोष व्यक्त केला आहे.  त्यांची 24 वर्षीय लेक एका श्रीमंताच्या निष्काळजीपणाची बळी ठरली. अश्विनी आता या जगात नाही. पुण्यात दारूच्या नशेत पोर्शे कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाने दुचाकीवरुन जाणाऱ्या अश्विनीला चिरडलं, हा अपघात इतका भीषण होता की, अश्विनीचा जागेवरच मृत्यू झाला. अश्विनीचे वडील मध्य प्रदेशाच्या विद्यूत मंडळात काम करतात. अश्विनीला एक भाऊही आहे. दोघेही इंजिनीयर आहेत. मोठा भाऊ बंगळुरूत नोकरी करतो आणि अश्विनी भावापेक्षा लहान आहे. आई-वडील जबलपूरमध्ये एकटे राहतात. रात्री 10 वाजता अश्विनी वडिलांशी फोनवरुन बोलली होती. जेवायला बाहेर जात असल्याचं तिने वडिलांना सांगितल. त्यानंतर मुलीशी काहीच बोलणं झालं नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. 

नक्की वाचा - पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक

बापाचा संताप...
मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अश्विनीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. पोलीस केवळ हेल्मेट तपासतात. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यांचं म्हणणं आहे की, अल्पवयीन जलद गतीने गाडी चालवित होता. दुसरीकडे पोलीस हेल्मेट तपासण्यात व्यस्त होते.      

Advertisement

पोर्शे कारने घेतला जीव
अश्विनीच्या वडिलांनी सांगितलं की, रस्ते अपघात रोखण्यासाठी नवे किंवा वेगळा कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला शिक्षा मिळेलही, मात्र अश्विनीच्या कुटुंबात तिच्या नसण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरणं अशक्य आहे.