प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा लैंगिक छळ, नायर रुग्णालयाच्या प्राध्यापकाचे निलंबन

या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार  समितीकडे सोपवण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर प्रकार घडला होता. एका सहयोगी प्राध्यापकावर या तरुणीने आरोप केला होता. या सहयोगी प्राध्यापकाला निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार  समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : Viral Video : ज्युसवाल्याने जमा करून ठेवली होती लघवी, ग्राहकाला चव विचित्र लागल्याने फुटले बिंग

नायर रुग्णालय आणि  वैद्यकीय महाविद्यालयात हे मुंबई महापालिकेतर्फे संचालित रुग्णालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने, रुग्णालयात कार्यरत सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.   रुग्णालय स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक  समितीने या प्रकरणी चौकशी केली. तसेच, 'कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती' यांनी देखील या प्रकरणामध्ये गंभीर दखल घेतली. या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती' यांचेकडे हस्तांतरित करण्यात आली. जेणेकरून या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करता येईल.

हे ही वाचा : सावत्र आईचं क्रूर कृत्य, अंथरुणात सू केली म्हणून 5 वर्षांच्या लेकीला उलथन्याने शरीरभर चटके! 

 चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, या तक्रारीनुसार आरोपी असलेल्या सहयोगी प्राध्यापकाचे प्रशासनाने निलंबन केले आहे.  मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Topics mentioned in this article