जाहिरात

सावत्र आईचं क्रूर कृत्य, अंथरुणात सू केली म्हणून 5 वर्षांच्या लेकीला उलथन्याने शरीरभर चटके! 

तरीही चिमुकली हसत -खेळत होती. आईने गरम उलथनं करून चटके दिल्याचं सांगितलं आणि अंगावरील सर्व जखमा दाखवल्या.

सावत्र आईचं क्रूर कृत्य, अंथरुणात सू केली म्हणून 5 वर्षांच्या लेकीला उलथन्याने शरीरभर चटके! 
कोल्हापूर:

कोल्हापुरातून (Kolhapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीला उलथनं गरम करुन तोंडावर चटके दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंथरूणात लघुशंका केल्याच्या कारणास्तव हे भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. ही घटना कासारवाडीतील आहे. शिरोली पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा नोंद झाला आहे. पूजा मगरे असं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव आहे.

शिरोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम मोकिंदराव मगरे यांनी आरोपी पुजा शुभम मगरे (वय 23) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. दोघांनाही पहिल्या लग्नापासून प्रत्येक एक एक मुली आहेत. 13 सप्टेंबर 2024 रोजी मुलीचे वडील कामावर गेले असताना आरोपी पुजा मगरे ही सावत्र मुलीने (वय 5)अंथरुणात लघुशंका केली म्हणून रागावली. मुलीला भीती दाखविण्यासाठी तिने घरातील उलथने गरम करून तिच्या गालावर, ओठावर, गळयाजवळ, लघवीचे वरच्या बाजूला व मांडीवर चटके दिले. 

10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!

हे ही वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला शरीरभर खूप ठिकाणी जखमा झाल्या होत्या. मुलगी लहान असल्यामुळे झालेल्या जखमांचे गांभीर्य तिच्या लक्षात आले नाही. तिच्या जखमा पाहून शेजारच्यांनी तिची विचारपूस केली. तरीही चिमुकली हसत -खेळत होती. आईने गरम उलथनं करून चटके दिल्याचं सांगितलं आणि अंगावरील सर्व जखमा दाखवल्या. गावातील सरपंचाला याबाबत कळताच त्यांना वडिलांना जाब विचारला. शेवटी सरपंचाने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपी पुजा शुभम मगरे विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
राहुल सासुरवाडीला आला, 3-4 दिवस राहिला; पत्नीचा राग मेहुण्याच्या बाळावर...; संतापजनक प्रकार!
सावत्र आईचं क्रूर कृत्य, अंथरुणात सू केली म्हणून 5 वर्षांच्या लेकीला उलथन्याने शरीरभर चटके! 
manegaon-hotel-owner-assaults-customer-batata-vada-salt-complaint
Next Article
वड्यात मीठ जास्त पडल्याची तक्रार, वडेवाले चिडले; ग्राहकाला धू धू धुतले