बदलापूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या 'चादर गँग'चा पर्दाफाश, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

Badlaour News : बदलापूरमधील घोरपडे चौकातल्या टायटनच्या शोरुममधून सुमारे 600 घड्याळांची चोरी झाली होती. ही चोरी करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलापूर:

निनाद करमरकर, प्रतिनिधी

Badlaour News : बदलापूरमधील घोरपडे चौकातल्या टायटनच्या शोरुममधून सुमारे 600 घड्याळांची चोरी झाली होती. या महागड्या घड्याळांची किंमत लाखोंच्या घरात होती. या घटनेमुळे बदलापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसंच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. बदलापूर पोलिसांना अखेर ही चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश करण्यात यश मिळालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बदलापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक या चोरांचा तपास करत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणात चादर गँग सहभागी असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणातील काही आरोपी बिहारमध्ये पळून गेले होते. त्यानंतर बदलापुर पोलिसांनी बिहार गाठत काही आरोपींना बेड्या ठोकल्या, तर काहींना मुंबईतून अटक करण्यात आली.  दरम्यान, या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर चार आरोपी फरार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

( नक्की वाचा : चोरट्यांची 'गटारी', कल्याणमधील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला )

दरम्यान अटक असलेल्या या तीन तिन्ही चोरांकडून 406 घड्याळं आणि 64 मोबाईल असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे, तर या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच फरार आरोपी आणि उर्वरित मुद्देमाल पकडला जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी सुरेश वराडे यांनी दिली आहे.

Topics mentioned in this article