जाहिरात
This Article is From Aug 03, 2024

चोरट्यांची 'गटारी', कल्याणमधील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला

Kalyan Crime News : कल्याण स्टेशन परिसरात गिरीष वाईन शॉप आहे. आज सकाळ वाईन शॉप चालक दुकानात आले. दुकानात सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या. वाईन शॉपमधील लॉकरमधून 4 लाख 75 हजार रुपये गायब होते.

चोरट्यांची 'गटारी', कल्याणमधील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला

अमजद खान, कल्याण

वाईन शॉपमध्ये शिरुन दोन चोरट्यांनी जवळपास पाच लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या महात्मा  फुले पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या वाईन शॉपमध्ये चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

कल्याण स्टेशन परिसरात गिरीष वाईन शॉप आहे. आज सकाळ वाईन शॉप चालक दुकानात आले. दुकानात सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या. वाईन शॉपमधील लॉकरमधून 4 लाख 75 हजार रुपये गायब होते. या वाईन शॉपच्या मागच्या बाजूला एक्झॉस्ट फॅन लावण्यात आले होते. तो फॅन काढण्यात आला होता. दुकान चालकाने दुकानाचा सीसीटीव्ही पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. 

दुकानात दोन चोर शिरले होते. एक्झॉस्ट फॅन काढून त्यांनी दुकानात प्रवेश केला. वाईन शॉपमधील 4 लाख 75 हजार रुपये घेऊन चोर पसार झाले. वाईन शॉप चालक कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीत चोरट्यांचे चेहरे दिसून येत आहेत. लवकरच दोन्ही चोरटे अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कल्य़ाण स्टेशन परिसर वर्दळीचा मानला जातो. पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही चोरी झाली आहे. म्हणजे स्टेशन परिसरातील भाजी मार्केट सुरु झाले होते. तरी या परिसरात चोरट्यांनी वाईन शॉपवर डल्ला मारला.पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: