बदलापूरातील (Badlapur Child Abuse) एका प्रसिद्ध शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक शोषण करणारा आरोपीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांची बंदुक घेऊन त्याने स्वत:वर गोळी झाडली. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. (Badlapur accused Akshay Shinde)
अक्षय शिंदे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याच्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. अक्षय शिंदे याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अक्षय शिंदे याच्याविरोधात पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. अक्षयविरोधात पोलिसांना एक भक्कम साक्षीदार सापडला असून त्या साक्षीदाराची साक्ष ही अक्षयला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी मदत करणारी ठरणार आहे.
नक्की वाचा - बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही
अक्षयने एकूण तीन लग्न केली होती, आणि त्याच्या पहिल्या दोनही पत्नी त्याला सोडून गेलेल्या होत्या. बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने अक्षयच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. तिने सांगितले होते की, लग्नाच्या पाच दिवसांतच ती अक्षयला सोडून गेली होती. अक्षयआपल्यासोबत हिंसक पद्धतीने वागायचा खासकरून शारीरिक संबंधांच्यावेळी तो हैवानासारखा वागायचा. त्याच्या लिंगपिसाट प्रवृत्तीला कंटाळूनच आपण त्याला सोडून गेल्याचे पहिल्या पत्नीने सांगितले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world