Badlapur Crime : अक्षय 'लिंगपिसाट आणि हैवान'; पहिल्या पत्नीचा जबाब ठरणार टर्निंग पाँईंट

अक्षय शिंदे प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

बदलापुरातील (Badlapur Child Abuse) एका नामांकित शाळेतील  दोन चिमुरड्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे (Akshay Shinse) याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अक्षय शिंदे प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला. ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहते. अक्षयची पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेरी निघून गेली होती.  अक्षय शारिरीक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा. त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखी होती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही. त्या पाच दिवसात अक्षयची लैंगिक वासना पाहता तो कोणतंही भयंकर आणि क्रूर कृत्य करू शकतो. त्याच्या विरोधात साक्ष द्यायला तयार असल्याचं तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. 

नक्की वाचा - बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!

त्यामुळे बदलापूर प्रकरणात मोठा दिलासा मिळू शकतो. सद्यस्थितीत या प्रकरणातील पुरावे अपेक्षितपणे मजबूत नाहीत. त्यामुळे कोर्टात प्रकरण सैल पडू शकतं. मात्र महिलेच्या साक्षीमुळे अक्षयसारख्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळणं शक्य झालं आहे. याबाबत टीओआयला एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अक्षयला कठोर शिक्षा होण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीचा जबाब टर्निंग पॉइंट ठरू शकतो.

तीन वेळा लग्न...
बदलापूर प्रकरणातील तपासादरम्यान मिळेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने तीन वेळा लग्न केलं होतं. यातील पहिल्या दोघी जणी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या. तर त्याच्यासोबत राहणारी  तिसरी पत्नी गर्भवती आहे. पहिल्या दोन पत्नींबाबत अक्षयला विचारलं असता त्या दोघींचा स्वभाव चांगलं नसल्याचं म्हणाला. 

Advertisement

शाळेच्या संस्थापकांविरोधात कारवाई...
या प्रकरणात शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल  (20 वर्षे अध्यक्ष आणि पदाधिकारी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सचिव तुषार आपटे (20 वर्षे सचिव) - अपक्ष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वांभोवतीची कलमं कठोर असून यात 20 वर्षे किंवा आजन्म कारावास होऊ शकतो

Advertisement