जाहिरात

बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!

बदलापूर प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळेलही मात्र तिच्या मनावरील आघात पुसणं कठीण आहे. 

बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!
बदलापूर:

बदलापुरातील (Badlapur Child Abuse) दोन चिमुरडींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं. लहानग्या वयात झालेल्या या अत्याचाराच्या घटनाने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडींला चालताही येत नव्हतं. ती शाळेत जाण्यास तयार नव्हती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली. या प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळेलही मात्र तिच्या मनावरील आघात पुसणं कठीण आहे. 

चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे बदलापुरात संतापाचं वातावरण असतानाच आता बदलापूरमध्ये एका पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की वाचा - किती दिवस मेणबत्त्या जाळणार ? एकदा बलात्काऱ्याला जाळून बघा! गोविंदांकडून बदलापूर घटनेचा निषेध

पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब उत्तर प्रदेशमधील असून गेल्या काही वर्षांपासून बदलापुरात वास्तव्याला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 54 वर्षीय आरोपी त्याच्या 15 वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. या प्रकरणात बदलापूर पूर्व पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यादिवशी 22 ऑगस्ट रोजीही पुन्हा एकदा बापानेच लेकीवर बलात्कार केला. यानंतर ती घाबरून घरातून निघून गेली. रात्री उशीरा ती घरी परतली. त्यानंतर सोमवारी तिने वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केली असून तो फरार झाल्यामुळे त्याचा शोध घेतला जात आहे.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पुतळा बसवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय? किती घ्याव्या लागतात परवानग्या ?
बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!
Chief Minister Ladki Bahin Yojana mandatory to do e-KYC to get the money
Next Article
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तत्काळ मिळतील, बँक खातं बंद असलं तरी टेन्शन नको!