अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

बदलापुरातील स्मशानभुमीत अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार (Akshay Shinde funeral) करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात (Akshay Shinde encounter case) उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना फटकारलं आहे. हा एन्काउंटर नसल्याचं सांगताना कोर्टाने पोलिसांकडे प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान बदलापुरातील दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा अक्षय शिंदे याच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या वडिलांना बदलापूर पूर्व पोलिसांकडे यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या अशी मागणी अक्षयच्या वडिलांकडून करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - माझी बायको बनून राहा! 60 वर्षांच्या आईसोबत मुलाने जे केलं ते भयंकर होतं

बदलापुरातील स्मशानभुमीत अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार (Akshay Shinde funeral) करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. दुसरीकडे अक्षयच्या वकिलांच्या म्हणण्यासाठी त्याचा मृतदेह दफन करायचा आहे. मात्र त्यासाठीही जागा मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभूमीत होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

नक्की वाचा - महिलेचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या मुख्य आरोपीचाही धक्कादायक शेवट, दुचाकीशेजारी आढळला...

हायकोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी स्थानिक उपायुक्तांमार्फत स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं होतं. मात्र अजूनही जमीन न मिळाल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा अक्षयच्या वडिलांचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या अहवालात अक्षयच्या शरीरावर काही खुणा आढळल्या आहेत. पुढील तपास करण्याची गरज लागण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा दहनविधी न करता दफनविधी केला जाणार असल्याची माहिती अक्षयच्या वकिलांकडून दिली जात आहे.  मृतदेह जतन करण्यासाठी तो दफन केला जाणार आहे.