उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून एक हैराण (Shocking News) करणारी घटना समोर आली आहे. एका 36 वर्षीय व्यक्तीला आपल्या 60 वर्षांच्या विधवा आईवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू होतं. सोमवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वरूण मोहित निगम यांनी आबिदला दोषी ठरवत त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच त्याच्यावर 51हजारांचा दंड ठोठावला. (Sexual abuse of mother)
न्यूज एजन्सी आयएएनएसनुसार, सरकारी वकील विजय शर्मा यांनी सांगितलं की, आज माननिय न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये मी अशी केस कधीच पाहिली नाही. 'माझा मुलगा राक्षस आहे, त्याने माझ्यावर बलात्कार केला' असं ही आई संतापाने सांगत होती. न्यायालयाने 20 महिन्यात या प्रकरणाची सुनावणी दिली.
नक्की वाचा - जन्मदात्या आईचा प्लान, मामाच्या हातात पिस्तुल; लैंगिक शोषण झालेल्या अल्पवयीन पीडितेचा भयंकर शेवट
काय आहे प्रकरण?
ही घटना बुलंदशहरातील एका गावात 16 जानेवारी 2023 रोजी घडली. दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आबिद आपल्या आईसह शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता. येथे त्याने आपल्या आईवर बलात्कार केला. घरी आल्यानंतर महिलेने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी सर्वांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो आपण केलेलं कृत्य योग्य असल्याचं सांगत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने मुलगा आणि सुनेसोबत राहावे अशी त्याची इच्छा होती. याशिवाय आईला पत्नी होऊन राहण्यासाठी तो धमकी देत होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पीडितेच्या छोट्या मुलाने दाखल केली तक्रार..
आबिदच्या घृणास्पद कृत्यानंतर त्याचा लहान भाऊ युसूफ आणि जावेदने या प्रकरणात एफआयआर दाखल केली होती. त्यांच्या आईने घडलेला प्रकार त्यांना सांगितला होता. 21 जानेवारी 2023 मध्ये 376 कलमाअंतर्गत आबिदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 22 जानेवारी त्याला अटक करण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world