Badlapur Murder Case: ड्रमनंतर आता बिछान्याची दहशत! बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीचा गळा आवळला, मग भयंकर घडलं

Badlapur Murder Case: बदलापुरामध्ये पत्नीने पतीच्या केलेल्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Badlapur Murder Case: पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा वाईट पद्धतीने काढला काटा"
Canva

Badlapur Murder Case: वर्षभरात राज्यासह देशभरात हादरवणाऱ्या हत्याकांडाच्या कित्येक घटना घडल्या. कुठे पत्नीने प्रियकरासोबत मिळून पत्नीची हत्या केली तर कुठे पतीने प्रेयसीसाठी पत्नीचा जीव घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले. या प्रकरणांमध्ये हत्या करण्यासाठी किंवा हत्या केल्यानंतर वापरलेल्या गोष्टींची लोकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली. आता बदलापुरातील हत्याकांड चर्चेत आलंय.

प्रियकरासोबत मिळून एका महिलेने पतीचा गळा आवळून हत्या केल्याचे वृत्त समोर आलंय. 44 वर्षीय व्यक्तीची हत्या करून या दोघांनी त्याचा मृतदेह नदीमध्ये फेकला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिलीय.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पोलिसांनी हत्या करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केलीय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, आरोपी मनीषा परमार आणि लक्ष्मण भोईर (वय 36 वर्ष) एकमेकांचे शेजारी आहेत आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. किसन परमारने पत्नी मनीषाला तिच्या अनैतिक संबंधांबाबत विचारपूस केली होती. आरोपींनी किसन परमारचा गळाचा दोरीने आवळून हत्या केली, त्यानंतर मृतदेह अंथरुणात लपवला आणि बदलापुरातील एका नदीमध्ये फेकला, यानंतर दोघंही फरार आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा: Beed News: पती, दारू अन् तो! जरांगेंच्या मर्डरचा प्लॅन, आरोपीची पत्नी आली समोर, धक्कादायक खुलासा)

पोलिसांनी गुरुवारी (6 नोव्हेंबर 2025) रात्री किसन परमारचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवलाय. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

(नक्की वाचा: Myrmecophobia Symptoms: मला माफ करा, मी मुंग्यांसोबत राहू शकत नाही, लेकीची काळजी घ्या; मुंग्यांना घाबरुन महिलेची आत्महत्या)