जाहिरात

Myrmecophobia: माफ करा, मी मुंग्यांसोबत राहू शकत नाही, लेकीची काळजी घ्या; मुंग्यांना घाबरुन महिलेची आत्महत्या

Myrmecophobia Symptoms: मुंग्यांच्या भीतीपोटी महिलेने आत्महत्या केली, घटनास्थळी सुसाइड नोट आढळली.

Myrmecophobia: माफ करा, मी मुंग्यांसोबत राहू शकत नाही, लेकीची काळजी घ्या; मुंग्यांना घाबरुन महिलेची आत्महत्या
"Myrmecophobia Symptoms: मुंग्यांच्या भीतीपोटी महिलेने आत्महत्या केली"
Canva

Myrmecophobia Symptoms: मुंग्यांना घाबरुन एका 25 महिलेने घरामध्ये कथित स्वरुपात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. राहत्या घरात पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. वर्ष 2022मध्ये महिलेचे लग्न झाले होते. या महिलेला तीन वर्षांची मुलगी होती. 

"लहानपणापासून मुंग्यांची भीती होती"

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती होती आणि याबाबत तिच्या माहेरी मंचेरियल या मूळ गावी एका हॉस्पिटलमध्ये तिचे समुपदेशनही करण्यात आले होते. घटनेच्या दिवशी महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला एका नातेवाईकाच्या घरी सोडले आणि घराची साफसफाई केल्यानंतर मुलीला घरी घेऊन जाईन, असे सांगितलं.

सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेला तिचा पती संध्याकाळी घरी परतला तेव्हा घराचे दार बंद होते. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने घराचा दरवाजा तोडला आणि घरात गेल्यानंतर पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला पत्नी आढळली. 

महिलेने सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं?

घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने लिहिलेले होते की, "मला माफ करा. मी मुंग्यांसोबत राहू शकत नाही. मुलीची काळजी घ्या" घराची साफसफाई करताना तिला मुंग्या दिसल्या असतील आणि भीतीपोटी तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी अमीनपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. 

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडालीय.

Dadar News: सरकारी कर्मचारी महिलेशी वाद, ड्रायव्हरने कॉल गर्ल म्हणत तिचे बनावट अकाउंट ओपन केलं; दादरमधील संतापजनक घटना

(नक्की वाचा: Dadar News: सरकारी कर्मचारी महिलेशी वाद, ड्रायव्हरने कॉल गर्ल म्हणत तिचे बनावट अकाउंट ओपन केलं; दादरमधील संतापजनक घटना)

(Content Source: PTI Bhasha)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com