Bandra Croma Showroom Fire : मुंबईत अग्नितांडव, वांद्रेतील क्रोमा शोरूम आगीत जळून खाक

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

Bandra Croma Showroom Fire : वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील स्क्वेअर मॉलच्या क्रोमा शोरूममध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या क्रोमा शोरूमला आग लागली असून यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही.